धायरी येथे माहेरवाशिणी गौराईचे  घरोघरी उत्साहात स्वागत

पुणे : धायरी येथे माहेरवाशिणी गौराईचे  घरोघरी उत्साहात स्वागत करण्यात आले. गौराईंच्या आगमनाने घरात मांगल्य व चैतन्य पसरले आहे. महिला भाविकांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण आहे.
पारंपारीक रीतिरिवाजात गौरी  पूजन करण्यात आले.


धायरी येथे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील यांच्या घरच्या गौराई यावेळी सै.अलका श्रीरंग चव्हाण सौ पल्लवी महेश जगताप अँड.सौ.सिद्धू स्वप्नील पाटील, सौ. धनश्री सन्मान टकले, सौ. रेखा प्रदीप चव्हाण आदींनी गौराईचे पूजन केले.
घरात हळदी-कुंकवाची पावले काढत त्यावरून गौराईंना आणण्यात आले. त्यानंतर विधिवत पूजन करत गौराईंची प्राणप्रतिष्ठापना केली गेली. पुढील दोन दिवस माहेरवाशिणी घरी पाहुणचार घेणार आहेत. आज गौराईचे  महापूजन करण्यातआले. यावेळी पुरणपोळी, करंजी-लाडू, या तसेच अन्य पदार्थांचा महानैवेद्य गौराईंना अर्पण केला. वर्षभरानंतर माहेरवाशिणी घरी आल्याने भाविकांमध्ये आनंद आहे.

See also  शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोबाबत आमदार शिरोळेंकडून  अधिकाऱ्यांची हजेरी