पुणे, दि. १२ : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने खेड-आळंदी विधानसभा मतदार संघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत (ईव्हीएम) जनजागृती आणि प्रात्यक्षिक करण्यात येणार असून त्यासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती फिरत्या रथाचा शुभारंभ खेड तहसील कार्यालयाच्या आवारात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
राजगुरूनगर येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उप विभागीय अधिकारी अनिल दौंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, तहसीलदार ज्योती देवरे, गट विकास अधिकारी विशाल शिंदे, नगर परिषदेचे मुख्यधिकारी अजिंक्य रणदिवे आदी उपस्थित होते.
मतदार संघातील कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत जनजागृती आणि प्रात्यक्षिके करणार आहेत. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची जनजागृती व प्रात्यक्षिक मोहीम सर्व मतदान केंद्रांतर्गत गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठ, मॉल आदी ठिकाणी राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेतंर्गत नागरिकांचे अभिप्राय घेण्यात येणार असून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल. जास्तीत जास्त नागरिकांनी ईव्हीएम यंत्राच्या प्रात्यक्षिकांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही तहसील कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.
घर ताज्या बातम्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या जनजागृतीसाठी फिरत्या रथाचा खेड...