पुणे महानगरपालिका कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत गणेशोत्सव संपन्न झाल्या नंतर लगेचच साफसफाई करिता सुरुवात करण्यात आली

पुणे : पुणे महानगरपालिका कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत गणेशोत्सव संपन्न झाल्या नंतर लगेचच साफसफाई करिता सुरुवात करण्यात आली.

कसबा विश्रामबावडा क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत महात्मा फुले मंडई  येथे लोकमान्य टिळक व लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्री गणेश विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री  अजित पवार,  केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत  पाटील, मा.महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले, मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी पी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

टिळक रोड येथून १६४, लक्ष्मी रोड येथून १८९ केळकर रोड येथून १०१ असे एकूण ४५४ गणेश मंडळांनी विसर्जन सोहळ्यात भाग घेऊन गणेशोत्सवाची सांगता झाली. श्री गणेश विसर्जन पूर्ण झाल्यानंतर त्वरित क्षेत्रीय कार्यालयाचे स्वच्छता सेवक यांनी प्रमुख रस्ते लक्ष्मी रोड , केळकर रोड, शास्त्री रोड ,टिळक रोड, कुमटेकर रोड, हे स्वच्छ करण्यात आले. गणेशोत्सवाच्या दरम्यान 12860 किलो निर्माल्य जमा करण्यात आले. गणेश उत्सव दरम्यान क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने संपूर्ण परिसरात ४७ ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली तसेच मूर्ती संकलित केंद्र सुद्धा स्थापन करण्यात आले. क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत एकूण १४२१५ गणेश मूर्तीचे संकलन करून पुनर्विसर्जनासाठी वाघोली येथे खाणी मध्ये पाठवण्यात आल्या . तसेच गणेशोत्सव दरम्यान तिन्ही शिफ्ट मध्ये स्वच्छता करण्यात येत होती . यादरम्यान सुलभ शौचालयाची सोय करण्यात आली होती . गणेश भक्तांच्या सोयीसाठी तात्पुरते १५० मोबाईल टॉयलेट ची व्यवस्था विविध ठिकाणी करण्यात आली होती. गणेश विसर्जन सुरळीत व्हावे याकरिता प्रत्येक विसर्जन घाटावरती व विसर्जनच्या ठिकाणी हौदाची सोय करण्यात आली होती . प्रत्येक हौदावरती पुरेशी विद्युत व्यवस्था करण्यात आली होती. तसेच घाट परिसरामध्ये जीव रक्षकाची नेमणूक करण्यात आली होती. विसर्जन मार्गांमध्ये विविध ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच आरोग्य सुविधेचे नियोजन करण्यात आले होते. श्री गणेश विसर्जन सोहळा दिनांक १७/९/२४ रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होऊन दुसऱ्या दिवशी १८/९/२४ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत संपन्न झाला. हा संपूर्ण सोहळा माननीय उपायुक्त परिमंडळ क्रं ५ डॉक्टर चेतना केरुरे, मा.महापालिका सहाय्यक आयुक्त सुहास जाधव, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक अशोक बंडगर व महेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आरोग्य निरीक्षक, स्वच्छता सेवक आणि स्थापत्य व विद्युत अभियंता यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण सोहळा आनंददायी वातावरणा मध्ये पार पडला. ‎कसबा विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४
स्वच्छता ही सेवा २०२४ अभियान राबविण्यात येत असून स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या टॅग लाईन अंतर्गत पुणे शहरामध्ये स्वच्छते बाबतची जनजागृती व स्वच्छतेचे काम सुरु आहे.

See also  वाचन सुलभता वाढविण्यासाठी अधिकाधिक पुस्तकांचे डिजिटायझेशन करावे : राज्यपाल रमेश बैस