बालेवाडी येथे यश संदीप ताम्हाणे यांच्या पर्यावरण पूरक कृत्रिम तलावात 1000 हून अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन

बाणेर/बालेवाडी : गणेश मूर्तींचे पर्यावरण पूरक तसेच विधिवत रीतीने विसर्जन व्हावे यासाठी बाणेर बालेवाडी परिसरातील भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा कोथरूड उत्तर विधानसभा उपाध्यक्ष यश संदीप ताम्हाणे यांच्यावतीने बालेवाडी येथील कम्फर्ट झोन सोसायटीच्या समोर कृत्रिम तलाव बांधण्यात आला होता. परिसरातील नागरिकांना या तलावात येऊन आपल्या गणेश मूर्तींचे पर्यावरण पूरक असे विसर्जन करावे असे आवाहन यश संदीप ताम्हाणे यांच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील 1000 हून अधिक कुटुंबांनी आपल्या गणेश मूर्तींचे विसर्जन या कृत्रिम तलावात केले.

बाणेर बालेवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रहिवाशी गृह प्रकल्प आहेत या गृह प्रकल्पातील सर्वांनाच नदी कडेला जाऊन  गणेश मुर्तींचे विसर्जन करणे शक्य होत नाही. तसेच नदीच्या घाटांवर एकाच वेळी अनेक नागरिक येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते व या गर्दीमुळे गणेश विसर्जन करण्यास आलेल्या नागरिकांची गैरसोय होते. हे लक्षात घेत यश संदीप ताम्हाणे यांच्यावतीने बालेवाडी येथील कम्फर्ट झोन सोसायटीसमोर कृत्रिम असा गणेश विसर्जन करण्यासाठी तलाव बांधण्यात आला होता. या ठिकाणी नागरिकांना प्रशस्त असे पार्किंग देखील उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच नागरिकांच्या मदतीसाठी अनेक कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले होते त्यामुळे नागरिकांना भक्तीमय वातावरणात विधिवत सोयीस्कर रित्या गणेश मूर्तींचे विसर्जन करता आले.

यावेळी यश संदीप ताम्हाणे यांनी सांगितले की, बाणेर बालेवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण सोसायटी झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची संख्या देखील वाढले आहे परिसरामध्ये बाणेर तसेच बालेवाडी येथे नदीकडे ला नागरिक आपल्या गणेश मूर्ती विसर्जन करतात परंतु काही वेळेस या मूर्ती नदीमध्ये विसर्जित केल्या जातात त्यामुळे नदीचे पाणी खराब होते. तसेच या ठिकाणी घाटांवर गर्दी होत असल्यामुळे नागरिकांचे देखील गैरसोय होते यामुळे नागरिकांना भक्तीमय वातावरणात शांततेमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात यावे यासाठी या कृत्रिम पर्यावरण पूरक विसर्जन तलावाची निर्मिती करण्यात आली होती. 1000 हून अधिक नागरिकांनी या ठिकाणी आपल्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले.

See also  नवचैतन्य हास्य परिवार पाषाण येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला