मंत्री महोदय चंद्रकांत पाटील यांना स्वतःच्या निधीतून रस्त्यावरचे खड्डे बुजवावे लागतात ही शोकांतिका – उज्वल केसकर ; शिवाजीनगर किंवा कोथरूड मधून लढण्याची तयारी

पुणे : भाजपचे जेष्ठ नेते उज्ज्वल केसकर यांनी (Pune) आगामी विधानसभा निवडणूक शिवाजीनगर किंवा कोथरूड मतदारसंघातून लढविण्याची तयारी सुरू केली आहे. विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील आणि सिद्धार्थ शिरोळे हे सध्या प्रबळ दावेदवार मानले जात असले तरी उज्वल केसकर यांनी तयारी दर्शवल्याने भाजपा अंतर्गत तिकिटासाठी होत असलेली स्पर्धा अधिक उत्सुकतेची झाली आहे. उज्वल केसकर यांनी भाजपामध्ये विधानसभेची इच्छा व्यक्त करत असताना मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यपद्धती संदर्भात देखील प्रश्न उपस्थित केले आहेत.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला कोथरूड मतदारसंघ गेल्याने केसकर यांनी बंड पुकारलं होतं. त्यावेळी त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली. मात्र, त्या निवडणुकीत केसकर यांचा पराभव झाला होता. 2012 मध्ये ‘पुणे जनहित आघाडी’ नावाचा पक्ष स्थापन करून पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. मात्र, त्याचा फार काही उपयोग झाला नाही. 2014 मध्ये केसकर यांना भाजपमध्ये घेण्यात आले. 

उज्जवल केसकर म्हणाले, गेल्या काही वर्षापासून पुणे आणि पुणे शहरातील अनेक निर्णय वादग्रस्त झाले आहेत. मी आणि  अनेक सहकारी मित्रांनी यावर सनदशीर मार्गाने आवाज उठवला आहे. प्रत्येक वेळेला न्यायालयात जाऊन दाद मागणे हे लोकशाही परंपरेला शोभेचे नाही. पुण्यातील सर्व संस्थाने मान्य केलेला पौड फाटा बालभारती रस्ता काही आमदारांनी विरोध केल्यामुळे थांबला. मध्यमवर्गीय पुणेकरांच्या घरावर सहा मीटर नऊ मीटर रस्ता रुंदी टाकून त्यांचे भविष्यातील विकास बंद केला त्याविरुद्ध न्यायालयीन लढाई लढली यश आले.

नांदेड सिटी येथील नागरिकांवर जो जिझिया कराचा बोजा टाकला होता (Pune) त्याविरुद्ध सनदशीर मार्गाने लढाई करून त्यांना न्याय मिळवून दिला जवळपास 20 हजार सदनिका धारकांना याचा फायदा मिळाला यात कुठेही ते कुठल्या विधानसभा मतदारसंघात आहेत याचा विचार केला नाही. पीएमआरडीए आयुक्त संचालक नगर रचना आणि एक लोकप्रतिनिधी अशी समिती तयार करून पुढील निर्णय करावा यासाठी आग्रही आहोत.

23 गावांचा विकास आराखडा संपूर्णपणे बेकायदेशीर असून तो रद्द करावा यासाठी लढाई चालू आहे.  ससून समोरची जागा एका बिल्डरच्या घशात घालण्याच्या प्रयत्नाला पहिल्यांदा विरोध केला. एक ना अनेक प्रश्न घेऊन लोकप्रतिनिधी नसताना देखील कार्यरत आहे.मंत्री महोदय चंद्रकांत पाटील यांना स्वतःच्या निधीतून रस्त्यावरचे खड्डे बुजवावे लागतात ही शोकांतिका आहे याबाबत प्रशासनाला धारेवर धरले. चंद्रकांत दादा पाटील यांनी पाच वर्षानंतर कोथरूडच्या ट्रॅफिकच्या संदर्भात एक व्हाट्सअप नंबर जाहीर केला याबद्दल अभिनंदन केले.

यात्रा, कार्यक्रम टाळ देणे या उपक्रमाबाबत सर्व संबंधितांचे अभिनंदन परंतु नागरिकांना लोकप्रतिनिधी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हवा आहे असे मला वाटते. या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधीची भूमिका ही महत्त्वाची असते. आणि ती निभवण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढवावी असे मला वाटते आणीबाणीत वयाच्या चौदाव्या वर्षी सत्याग्रह करून तुरुंगात गेलेला मी एक सामान्य स्वयंसेवक कार्यकर्ता आहे. सत्तेतन संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता या तत्त्वाच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आहे.  एक कार्यकर्ता म्हणून जनतेच्या दरबारात जाण्याचा माझा विचार आहे; असे मत उज्जवल केसकर यांनी व्यक्त केले.

See also  उरावडे जळीतकांड दुर्घटनेतील मृतांचे नातेवाईक आणि जेष्ठ शिवसैनिकांच्या शुभहस्ते मुळशी तालुक्यातील अग्निशामक केंद्राचे भूमिपूजन