सुस येथील अकिंता जगताप (काळे) यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा २०२४ पुरस्कार नुकताच जाहीर

पुणे : सुस-बाणेर गावची कन्या अकिंता जगताप (काळे) यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा २०२४ पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. अकिंता जगताप ही राष्ट्रीय कबड्डी खेळाडू असून, अतिशय संघर्षातून आणि आपल्या खेळाडूवृत्तीमुळे तिने हा पुरस्कार मिळवला आहे.

महत्वाची बाब म्हणजे तिचे पती विकास काळे हे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते आहेत. प्रथमच महाराष्ट्र राज्यात दोघेही दाम्पत्यांना राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे, ही बाब सुस-बाणेरमधील नागरिकांसाठी अभिमानास्पद असून तिचे विविध स्तरावर कौतुक केले जात आहे.

See also  रत्ने आणि दागिने आभूषण पुरस्कारांचे राज्यपालांच्या हस्ते वितरण