सहकार महर्षी जनसेवक डॉ. दिलीप मुरकुटे पाटील(शिवसैनिक) यांचा अभिष्टचिंतन सोहळा व आदर्श मातांचा सत्कार समारंभ संपन्न

महाळूंगे :सहकार महर्षी जनसेवक डॉ. दिलीप मुरकुटे पाटील(शिवसैनिक) संस्थापक अध्यक्ष बाणेर नागरी पतसंस्था (सचिव भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेर) यांच्या वाढदिवसानिमित्त महाळूंगे येथे आमदार जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या हस्ते महाळूंगे गावातील आदर्श मातांचा सत्कार, नवनाथ महाराज लिम्हण, जेजुरीच्या खंडेराया च्या देवस्थान ट्रस्ट वर ॲड. पांडुरंग थोरवे यांची निवड झाल्याबद्दल आणि प्रिया पाडाळे हिने ऑलिंपिक नॅशनल गेम्स मध्ये पदक प्राप्त केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र भुषण समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन आयोजित केले होते.

यावेळी प्रास्तविक करताना डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांनी सांगीतले की, वाढदिवसाचे औचित्य साधून अनाथ मुलांचे संगोपन करणारे नवनाथ महाराज, आपल्या सर्वांचं कुलदैवत जेजुरीच्या खंडेराया च्या देवस्थान ट्रस्ट वर ॲड. पांडुरंग थोरवे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार आहे आणि महाळूंगे गावातील आदर्श माता आहे त्या आदर्श मातांचा सत्कार होणार आहे त्यांचा मला अभिमान वाटतो. या सत्कारमूर्ती आदर्श मातां कडे पाहिले की, मला माझ्या आई ची आठवण होते. अशा आदर्श मातांचा सन्मान करताना मला आनंद वाटतो.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिन अहिर यांनी बोलताना सांगितले की, सातत्याने सामाजिक भान ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. दिलीप मुरकुटे पाटील. त्यांना मनापासून वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. दिलीप मुरकुटे आपले वय किती? आपण त्यांना इकडे बघितल्यानंतर त्यांचे वय काय आहे बोलण्यापेक्षा त्यांच्या कामांमधून त्यांचं वय दिसतय आणि सामाजिक क्षेत्रांमधून काम करून आलेला व्यक्ती कुठल्या जातीचा आणि कुठल्या धर्माचा किंवा कुठल्या पक्षाचा आहे, तो राहणार आहे का जाणार आहे हे न बघता मदत करणारे व्यक्तिमत्व आमचे दिलीप मुरकुटे पाटील.

यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक ज्ञानेश्र्वर तापकीर, बाबुराव चांदेरे, शिवाजी बांगर, सुनील चांदेरे, शंकर मांडेकर, ह भ प पांडुरंग दातार, संत सेवक मारुती कोकाटे, हभप विश्वास कळमकर, ह भ प गहिनीनाथ कळमकर, मारुती चांदेरे, गणपत मुरकुटे, अशोक मुरकुटे, नाना वाळके, राहूल बालवडकर, संतोष मोहोळ, संतोष तोंडे, राम गायकवाड, ॲड. सुदाम मुरकुटे, राजू शेडगे, किरण मुरकुटे, अर्जुन शिंदे, अर्जुन ननावरे, रामदास विधाते, विशाल विधाते, विजय विधाते, प्रल्हाद मुरकुटे, नवनाथ मुरकुटे, अर्जुन तापकीर, आनंदा कांबळे, जंगल रणवरे, जयेश मुरकुटे, कालिदास मानमोडे, लक्ष्मीबाई कोळेकर, नामदेव गोलांडे, संजय ताम्हाणे, ॲड. दिलीप शेलार, सागर भसे, शांताराम पाडाळे, नरेंद्र पाडाळे, गुलाबराव तापकीर, नामदेव पाडाळे, भानुदास पाडाळे, मनोहर पाडाळे, जालिंदर पाडाळे, संजय पाडाळे आणि सत्कार मुर्ती माता भगिनी, सांप्रदायिक क्षेत्रातील विविध मान्यवर आणि महाळूंगे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  नर्‍हे येथे वाईन शॉप मालकाला लुटले