हिंगोली : हिंगोलीचे माजी खासदार शिवाजी माने यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षामध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थिती मध्ये प्रवेश केला.
हिंगोली व कळमनुरी मतदारसंघाचे जे मुलभूत प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. गेल्या ५ वर्षामध्ये हिंगोली जिल्ह्याचे प्रश्न उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांनी सोडवले नाहीत म्हणून शिवसेना पक्ष सोडून महाराष्ट्र स्वराज्य पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचे शिवाजी माने यांनी म्हटले.
हिंगोली व कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजी माने इच्छुक असून, छत्रपती संभाजीराजे जो निर्णय घेतील, त्या मतदारसंघामधून लढण्यास तयार असल्याचे शिवाजी माने यांनी म्हटले. यावेळी पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव उपस्थित होते.