औंध : औंध नेहरू तरुण मंडळ येथे महिलांचे अथर्वशीर्ष पठण आयोजन करण्यात आले. उपस्थित महिलांनी भारतमाता, गोमाता, आणि हिंदू धर्माच्या संरक्षणाचा संकल्प अथर्वशीर्ष पठण करण्यापुर्वी केला.
सर्व महिला पिवळ्या रंगाच्या साडी परिधान करून या कार्यक्रमास उपस्थित होत्या. अथर्वशीर्ष पठण झाल्यावर आरती
आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण शिववंदना करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रीय सेविका समिती, पौरोहित्य वर्ग, सनातन संस्था, पतंजली योग पीठ, आर्ट ऑफ लिविंग, श्री बैठक, वारकरी संप्रदाय, इस्कॉन अशा विविध आध्यत्मिक सामाजिक संस्थांच्या साधक महिलांच्या हस्ते आणि उपस्थित विद्यार्थिनीच्या हस्ते मुलींच्या हस्ते श्रींची आरती संपन्न झाली.
उपस्थित सर्वांनसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.या कार्यक्रमासाठी परिसरातील महिला, शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.