बाणेर : शिक्षणासाठी असलेल्या अडचणी सोडवणे खूप महत्त्वाचे काम आहे. कर्ज देणंघेणं आर्थिक व्यवहार या बऱ्याच पतसंस्था करतात. आर्थिक क्षेत्राबरोबरच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात योगीराज पतसंस्था काम करत आहे. शिष्यवृत्ती आणि शिक्षणासाठी ची मदत करणारे योगीराज पतसंस्थेचे हात हे खूप मोठे हात आहेत असे मत माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लक्ष्मीपूजन निमित्त्याच्या कार्यक्रमा त प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत माडगूळकर, संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, अशोक मुरकुटे, माजी नगरसेविका रंजना मुरकुटे, स्वप्नाली सायकर, उद्योजक प्रमोदकुमार बेलसरे, चंद्रलेखा बेलसरे, गोसेवक संजय बालवडकर, डॉ. राजेश देशपांडे, माजी सरपंच नारायण चांदेरे, दत्तात्रय तापकीर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी वर्षभरात विक्रमी दैनंदिन ठेव जमा केलेले संस्थेचे दैनंदिन ठेव प्रतिनिधी रघुनाथ भुजबळ व संदीप निम्हण यांचा विशेष सत्कार करण्यात आला, तसेच गणेश कदम या गरीब मुलाला शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित यांचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते यांनी केले, तर तज्ञ संचालक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रविंद्र घाटे यांनी आभार मानले.