बाणेर : कोथरूड मतदार संघातील फिरता दवाखाना यामुळे अनेक गोरगरीब व सर्व सामान्य कुटुंबातील नागरिकांच्या घरापर्यंत दवाखाना मिळाला महिला व कामगार यांना आरोग्याच्या सुविधा दारात उपलब्ध करून देणारा हा अभिनव उपक्रम आमदार चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूडचे आरोग्यदूत! अशी ओळख करून देणारा आहे.
“आरोग्यम् धनसंपदा” असे म्हणतात. उत्तम आरोग्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. पण आर्थिक पाठबळा अभावी अनेकांना आजार अंगावरच काढावे लागतात. आपल्या कोथरूड मतदारसंघातील सर्वांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.
कोथरूड मतदार संघात फिरता दवाखाना, आयुष्मान भारत कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी शिबिरे, गुंतागुंतींच्या आजारावर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखापर्यंतची मदत चंद्रकांतदादांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. कोथरूडकरांसाठी सांधे, मणके तसेच स्नायूंच्या समस्या दूर करण्यासाठी मोफत आयुर्वेदिक सल्ला शिबिर चंद्रकांतदादा पाटील यांनी आयोजित केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीदिनानिमित्त कोथरूडमध्ये नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया उपक्रम चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून घेण्यात आला.
कोथरूडकरांच्या आरोग्याची सेवा करणाऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुतार दवाखान्यात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा चंद्रकांतदादांनी विशेष सन्मान केला. संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदी येथे येणाऱ्या वारकरी बांधवांसाठी आरोग्य सेवा शिबिर आयोजित करणे, योग विद्येच्या माध्यमातून आरोग्य सुदृढ राहावे यासाठी “मानसी” उपक्रम सुरू करणे, उपचारासाठी मुंबईत जाणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना वास्तव्यासाठी सावली केअर सेंटरची उभारणी, कोविड काळात रुग्णांना वैद्यकीय मदत तसेच कोरोना वॉरियर्सना पीपीई कीटचे वाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी फिजिओथेरपी कॅम्प असे विविध उपक्रम चंद्रकांतदादा पाटील यांनी राबवले.
कोथरूड परिसरातील वस्ती भाग, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, बाणेर बालेवाडी आधी परिसरात फिरता दवाखाना नागरिकांच्या सेवेत सातत्याने रुजू राहिला आहे. सर्वसामान्य नागरिकांना या दवाखान्याच्या माध्यमातून वेळेवर मिळणारे उपचार हे एक प्रकारे हजारो रुग्णांना आरोग्य संजीवनी ठरले.
आरोग्य विषयक विविध उपक्रमामुळे कोथरूडच्या सर्वांगीण विकासासाठी चौफेर उपक्रमांचे आयोजन करणारे चंद्रकांत दादा कोथरूड करांसाठी आरोग्यदूत ठरले आहेत.