हडपसर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रशांत जगताप यांच्यासाठी कंबर कसली, प्रचारासाठी घेतली बैठक

हडपसर : हडपसर विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येथील कन्यादान मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे प्रशांत जगताप यांना निवडून आणणार असा विश्वास शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीत शहरप्रमुख संजय मोरे, माजी शहरप्रमुख नाना वाडेकर, शिवसेना नेते वसंत मोरे, जिल्हाप्रमुख विजय देशमुख, संघटक नितीन गावडे, वक्ता विद्याताई होडे, संजय सपकाळ, विभागप्रमुख दत्ताभाऊ खवळे, सतीश जगताप, प्रविण हिलगे, रामभाऊ खोमणे,जान मोहमद शेख, दिलीप व्यवहारे, अजय सपकाळ, नंदकुमार फुलारे, अमित गायकवाड, सुरज मोराळे,  सागर चव्हाण, अभिजित कदम, राहुल सावंत, लखन जगताप, गणेश मोरे, गणेश देशमुख, उपविभाग प्रमुख मुकुल लाकडे, अनिकेत सपकाळ, भाऊ गायकवाड, मुन्ना माने, प्रशांत पोमण, भैया कापरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवारीसाठी इच्छुक होती, उद्धव साहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे नेत्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार हडपसर मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप यांना सुटला, आघाडीचा धर्म पाळत  जगताप यांना निवडून आणावे व आगामी महापालिका निवडणुकीची तयारी शिवसैनिकांनी करावी संजय मोरे, वसंत मोरे, नाना वाडेकर यांनी केले.

हडपसर मतदार संघातील शिवसैनिक पेटला असून महाविकास आघाडीतील उमेदवाराचे काम करणार व प्रशांत जगताप यांनाच निवडून आणणार असा विश्वास निवडणूक समन्वयक विजय देशमुख व विभाग प्रमुख दत्ताभाऊ खवळे यांनी व्यक्त केला.
यावेळी सतीश जगताप, दत्ताभाऊ खवळे यांनी जोरदार रॅली काढत शक्तिप्रदर्शन केले.

See also  औंध येथे बंद स्विमिंग पूल मध्ये साठलेल्या पाण्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती