महायुतीतील बंडखोर अपक्ष उमेदवार विजय डाकले भाजप विरोधात आक्रमक

पुणे : मी प्रामाणिक हिंदुत्व आणि धर्मासाठी त्याग केलेला कार्यकर्ता असून हिंदू धर्मासाठी अनेक आंदोलनात माझ्यावर गुन्हे दाखल आहेत. मी सर्व जातधर्माच्या नागरीकांना सोबत घेऊन सर्व समावेशक धोरण राबवून कोथरूड मतदारसंघाच्या विकासासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. माझ्या बहुजन समाजातील लोकांच्या आग्रह आणि पाठिंब्यावर मी हि निवडणूक लढवत असून कोथरूड मध्ये भाजपचा पराभव करणारच असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विजय डाकले यांनी सांगीतले. कोथरूड मतदार संघात महायुती तील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा (अजित पवार) कडून इच्छूक असलेले विजय डाकले पक्षाकडून संधी न मिळाल्याने बंडखोरी करीत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून चंद्रकांत पाटील निवडणूक रिंगणात असून महायुतीतील बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणून विजय डाकले निवडणुकीत येत पाटील यांना आव्हान दिले आहे.

विजय डाकले म्हणाले, कोथरूड मतदार संघ कोणाचा आहे बालेकिल्ला नाही. मी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. बहुजन समाजातील नागरिकांसाठी सातत्याने काम करत राहिलो आहे व सर्वांना सोबत घेऊन काम केले आहे. माझी उमेदवारी ही बहुजन समाजातील नागरिकांनी उभी केलेली उमेदवारी आहे. मी त्यांचे प्रतिनिधित्व करत आहे यामुळे निश्चितपणे समाज पाठीशी राहील.

सध्याचे मॅनेज झालेले राजकारण हे कोथरूड करांच्या पसंतीला पडणारे नाही. कोथरूड करांना खुल्या विचारांनी प्रतिनिधी निवडायचा आहे. कोणताही दबाव अथवा वाटपाची संस्कृती कोथरूडकर नागरिक स्वीकारणार नाहीत यामुळे अपक्ष उमेदवार म्हणून मला कोथरूडकर नागरिक अधिक पसंती देतील असे विजय डाकले यांनी सांगितले.

See also  मुळशी तालुक्यात रविवारी कृषी साहित्य संमेलन. शेतकरी संघाच्यावतीने आयोजन