पुणे : श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहाचा’ उद्घाटन समारंभ नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, काँग्रेसचे दत्ता बहिरट, महिला शहराध्यक्ष पूजा आनंद, माजी महापौर दीप्ती चवधरी, रजनी त्रिभुवन, चंद्रशेखर कपोते, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, रफीक शेख, सुनील मलके, प्रशांत सुरसे, रोहन सुरवसे, चेतन अगरवाल, सुरेश कांबळे, आयूब पठाण आदी उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविकात मोहन जोशी म्हणाले, “पंतप्रधान पदाची संधी असतानाही, तसेच देशातील अनेक बड्या नेत्यांनी विनंती करूनही सोनिया गांधी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केले. पदाचा त्याग करत, जनतेच्या सेवेचे कर्तव्य त्यांनी बजावले. त्यांच्या या त्याग, सेवा व कर्तव्य भावनेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या १९ वर्षापासून हा सप्ताह साजरा केला जातो. शहराच्या विविध भागात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.”
उल्हास पवार यांनी समारोपाचे भाषण केले. प्रशांत सुरासे यांनी सूत्रसंचालन केले. प्रथमेश आबनावे यांनी आभार मानले.