चंद्रकांत मोकाटे यांनी त्यांच्या आमदारकी व नगरसेवकपदाच्या काळात चांगली विकासकामे केली – गजानन थरकुडे

कोथरूड : महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी त्यांच्या आमदारकी व नगरसेवकपदाच्या काळात चांगली विकासकामे कोथरूड विधानसभा मतदारंसंघाचा विकास केला. त्यानंतरच्या 10 वर्षाच्या काळात विकासकामांचा वेग मंदावला. असे मत पुणे शहर शिवसेनेचे प्रमुख श्री गजानन थरकुडे यांनी व्यक्त केले.


महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी आज शनिवारी कोथरूड गावठाण, भुजबळ वस्ती, भूमकर आळी, खालची व वरची आळी कांबळे वस्ती एकता कॉलनी, आदी परिसरात पदयात्रा काढून नागरिकांशी संपर्क साधला या परिसरातील नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.
श्री थरकुडे म्हणाले की, मोकाटे सर्वसामान्य जनता डोळ्यासमोर विकासकामे केली ते या भागातील रहिवासी आह त्यामुळे या परिसरातील नागरिकांना जाणवणाऱया समस्याची माजी आमदार मोकाटे यांना जाणीव होती. मोकाटे कर्वेनगर वारजे कोथरूड परिसरात होणारी वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी कॅनलवर रस्ते बांधले चांदणी चौकातील होणाऱ्या अपघात विषयी आंदोलन केली आणि आवाज उठवला.


महाविकास आघाडीचे कार्यकर्ते श्री मोकाटेच पुन्हा आमदार व्हावेत म्हणून जोमाने काम करीत आहेत. त्यांच्या मध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. पदयात्रेत शिवाजी गाढवे, माजी नगरसेविका वैशाली मराठे, चंदू कदम, राजू मराठे, संजय मोकाटे, दत्तोबा वांबीरे, बाळासाहेब खैरे राजेश पासलकर, राजू मगर आदी सहभागी झाले होते.

See also  सिद्धार्थ शिरोळे यांचा सुज्ञ मतदारांवर विश्वास, विविध स्तरामधून शिरोळे यांना वाढता पाठींबा