बाबुरावजी घोलप महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

सांगवी : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या वतीने दिनांक 5 सप्टेंबर रोजी महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित केलेल्या उद्बोधन कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर अर्जुन डोके यांनी केले.


शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी मोबाईलचा कमीत कमी वापर करून आपल्या प्रकृतीकडे नीट लक्ष दिले पाहिजे ,पुरेशी झोप ,उत्तम आहार आणि नियमित व्यायाम करून अभ्यासात सातत्य राखल्यास उत्तम यश मिळते. “

प्राध्यापिका डॉक्टर वंदना पिंपळे म्हणाल्या ,”आपले जीवन हे एक बॅलन्स शीट आहे व त्यामध्ये अपमान व सन्मान या दोन्ही गोष्टींचा आपण उत्तम ताळमेळ बसवला पाहिजे”


याप्रसंगी प्राध्यापक भाऊसाहेब घोडके यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद करताना शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या संवादातील निर्माण होत चाललेली दरी हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय असून शिक्षणासाठी दगडधोंड्याचा मारा सहन करणाऱ्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांना ही शिक्षण व्यवस्था अभिप्रेत होती का असा सवाल उपस्थित केला. गुरु आणि शिष्याचं नातं महत्त्वाचं आणि संस्कारक्षम व्हाव म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील, मामासाहेब मोहोळ, बाबुरावजी घोलप यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी नेण्याचे काम केलं. त्यांचं स्मरण यानिमित्ताने होणं गरजेचं आहे तसेच आजचा शिक्षणातून उद्याच्या फातिमा बेग, मुक्ता साळवे डॉक्टर, अब्दुल कलाम यासारखे कर्मयोगी घडोत असा आशावाद व्यक्त केला .


याप्रसंगी इंग्रजी विभागातील प्रथम द्वितीय आणि तृतीय तसेच पदव्युत्तर पदवी या वर्गातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे कला प्रदर्शन सादर केले. यावेळी इंग्रजी विभागातील विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉ. वर्षा खांदेवाले डॉक्टर अर्जुन डोके, प्रा. डॉक्टर संगीता घोडके,प्राध्यापक डॉक्टर विकास जाधव, प्राध्यापक डॉक्टर शिवाजी शेळके प्राध्यापक प्रणाली शितोळे, प्राध्यापक भाऊसाहेब घोडके, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉक्टर वर्षा खांदेवाले यांनी केले,तर आभार प्राध्यापिका प्रणाली शितोळे यांनी मानले.

See also  स्कूल बस साठी नवीन नियमावली बनवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सनी निम्हण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी