कोथरूड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार ॲड.किशोर शिंदे यांनी आपल्या प्रचारादरम्यान वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला आहे.
गुरुवारी सकाळी ७ वाजताच त्यांनी भेटीगाठींना सुरुवात केली. कोथरूडच्या नवसह्याद्री सोसायटी कर्वेनगर, मेहंदळे गॅरेज आणि एरंडवणे परिसरातील उद्यानांना त्यांनी भेट दिली. डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उद्यान, शहीद मेजर ताथवडे उद्यान, स्व.राजा मंत्री उद्यान या उद्यानांमध्ये सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. अचानक पणे उद्यानामध्ये आपल्याला मनसेचे उमेदवार भेटायला आले आहेत हे समजल्यावर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत केले.
आम्ही तुम्हाला ओळखतो, आपलं काम छान आहे, राज साहेबांची सर्व भाषणे आम्ही अगदी मन लावून ऐकतो, त्यांच्या भाषणांनी आम्ही सर्वजण प्रभावित झालो आहोत,यंदा आम्ही राज साहेबांच्या पाठीशी उभे राहणार आहोत त्याचबरोबर मनसेचे उमेदवार म्हणून आपण आपल्या परिसरामध्ये उत्तम काम केले आहे, अशाच प्रकारचे काम आपण संपूर्ण कोथरूड विधानसभा मतदारसंघात कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे अशा भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या.
आमदार म्हणून निवडून आल्यावर मी आपल्या सर्व अपेक्षांची पूर्तती करणार असे आश्वासन त्यावेळी किशोर शिंदे यांनी सर्व नागरिकांना दिले. यावेळी किशोर शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रभाग क्र १३ मधील विभाग अध्यक्षा सुरेखाताई होले,दत्ता पायगुडे,गणेश शेडगे, योगेश वाव्हळ,राजेश शिगवण,हर्षद खाडे,अनिता शिंदे,उषा आवळे,गीता वायचाल इत्यादी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.