बाणेर : बालेवाडी येथील लक्ष्मी माता चौक येथे रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमध्ये टँकरचे चाक अडकल्याने भर रस्त्यामध्ये हजारो लिटर पाणी सोडून टँकर खाली करावा लागला. तसेच या परिसरामध्ये वाहतूक कोंडीचा देखील त्रास नागरिकांना सहन करावा लागला.
रस्त्यांमध्ये पडलेले खड्डे मुजवण्या साठी नागरिक वारंवार मागणी करत आहेत परंतु प्रशासनाकडून याची योग्य दखल घेतली जात नसल्यामुळे बाणेर बालेवाडी परिसरामध्ये लहान मोठ्या अपघातांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
लक्ष्मी माता मंदिर जवळील रस्त्यावर मोठ्ठा खड्डा आहे. त्यात टॅंकरचे चाक अडकले. टॅंकर निघत नसल्याने तो पुर्णपणे खाली करावा लागला. हजारो लिटर पाणी वाया गेले. नागरिकांना या खड्ड्यातून जातांना कसरत करावी लागत आहे.
महानगरपालिकेने तातडीने रस्त्यांमध्ये पडलेले खड्डे मोजवावेत अशी मागणी बालेवाडी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश रोकडे यांनी केली आहे.
























