मॉडर्न प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल वारजे मध्ये बाल दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

वारजे : वारजे शाखेतील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बाल दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

शाळेतील शिक्षकांनी मुलांसाठी ‘ एक जुटीने कसे राहावे ‘ असा संदेश देत पपेट शो सादर केला . मुलांसाठी शाळेने विविध पक्षी व प्राण्यांचे प्रदर्शन भरवले होते . या प्रदर्शनात प्रिन्स , कॉकटेल , आफ्रिकन बर्ड्स तसेच बेटा फिश ,  गोल्ड फिश ,  कलर विड्रो तसेच सिंगापूरी टर्टल  आणि हॅमस्टर,  इत्यादी पाळीव प्राणी व पक्षी होते . या प्रदर्शनाचा मुलांनी मनसोक्त आनंद घेत मुलांनी सेल्फी पॉईंट मध्ये फोटो काढले.

संस्थेचे अध्यक्ष गजानन एकबोटे, शालेय समितीचे अध्यक्ष शामकांत देशमुख तसेच व्हिजिटर सौ . पिंपळखरे मॅडम व शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा बर्डे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

See also  पानशेत पुरग्रस्त पुनर्वसित सहकारी सोसायटींच्या भाडेपट्टा जमिनीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक - पालकमंत्री चंद्रकांत पाटील