कोथरूड : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपिठाचे सर्किट बेंच पुण्यात स्थापन करण्यासाठी आपण सर्वांनी सामुहिकरित्या प्रयत्न करू असे आवाहन कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांनी मेळाव्यात केले.
ऍड राजेंद्र देशमुख व डॉ रविकिरण शाह यांनी काकडे सिटी येथील रत्ना हॉल मध्ये आयोजित केलेल्या वकील आणि डॉक्टर यांच्या मेळाव्यात चंद्रकांत मोकाटे बोलत होते.
या मेळाव्यात अनेक वकिलांनी सर्किट बेंचविषयी मागणी आपल्या मनोगतमध्ये केली. त्यावेळी श्री मोकाटे त्यांच्याशी संवाद साधताना बोलले.चंद्रकांत मोकाटे म्हणाले की, हायकोर्टाचे सर्किट बेंच पुण्यातील न्यायालयात सुरु करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या प्रयत्न केले पाहिजेत. माझ्यासहित सर्वांनी केंद्र व राज्यसरकार, गृहखाते व अन्य संबधितांशी पाठपुरावा करून सर्किट बेंच सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
ज्येष्ठ वकील ऍड भगवानराव साळुंखे म्हणाले की, पुण्यात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरु करावेत. नवोदित वकिलांना राज्य व केंद्र सरकारने मानधन सुरु करावेत. वकिली व्यवसाय करणाऱ्या नवीन वकिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. या मुलांसाठी योग्य गोष्टी कराव्यात.
ऍड लक्ष्मण राणे यांनी आपल्या भाषणात मागणी केली की, वकिलांना त्यांच्या जीवाची भिती असते. त्यांना संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी कायदा करण्यात यावा.ऍड मोनिका वाईकर यांनी सांगितलं की महिलां वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकवेळा उपस्थित होतो त्यांनाही संरक्षण देण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.
ऍड राजेंद्र देशमुख यांनी श्री मोकाटे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
ऍड मोनिका वाईकर यांनी सांगितलं की महिलां वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकवेळा उपस्थित होतो त्यांनाही संरक्षण देण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.
ऍड राजेंद्र देशमुख यांनी श्री मोकाटे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.