कॅंनव्हस किड्स स्कूल तर्फे महिला दिन साजरा

वारजे : अय्यप्पा मंदिर न्यू कोपरे रोड येथे  कॅंनव्हस किड्स स्कूल तर्फे महिला दिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक श्री योगेश माळी ,संचालक श्री गणेश दांगट , संस्थेचे केंद्रप्रमुख  सरोज बागवान उपस्थित होते. त्याचप्रमाणे शाळेच्या सर्व शिक्षिका सविता , गार्गी , श्रुती , विशाखा , रोहिणी , शुभ्रा  आणि मोनिका  इत्यादी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला जवळपास 300 ते 350 महिलांनी उपस्थिती दर्शवली. महिला दिनाचे औचित्य साधत फॅशन शो, सिंगिंग, डान्सिंग त्याचप्रमाणे टंग ट्विस्टर अशा वैविध्यपूर्ण खेळांचे आयोजन करून महिलांचा आनंद द्विगुणित केला .यामध्ये कॅनव्हस क्वीन हा किताब सौ सुमन घनगस यांनी पटकावला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

See also  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी श्रीकांत पाटील यांची नियुक्ती