दिव्यांग बांधवांनी घेतला चित्रपट पाहण्याचा आनंद

मांजरी : अस्तित्व कला मंच या संस्थेच्या वतीने जनाधार दिव्यांग संस्थेच्या दिव्यांग बांधवांना राजहंस या मल्टिप्लेक्स थिएटर मध्ये सुभेदार हा मराठी चित्रपट बघण्याचे नियोजन करण्यात आले यामुळे दिव्यांग बांधवांना चित्रपट पहाताना आनंद लुटण्याचा योग आला.


जनाधार दिव्यांग संस्थेच्या विनंतीला मान देऊन मांजरी गावचे उपसरपंच सुमित घुले पाटील यांनी दिव्यांग बांधवांना सुभेदार हा चित्रपट बघण्यासाठी बस उपलब्ध करून दिली. दिव्यांग बांधवांना कुठलाही शारिरीक त्रास न होता! आनंदाने प्रवास करून सुभेदार हा पिक्चर पाहता आला! यावेळी सुमित घुले पाटील व बाळासाहेब घुले,अध्यक्ष शिवाजी महाराज स्मारक समिती यांनी गाडीला नारळ फोडून पूजा केली व दिव्यांग बांधवांना चित्रपट पाहण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

See also  शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० लाखाचा निधी-अजित पवार