वारजे रामनगर भागात आमदार भीमराव तापकीर यांचा पदयात्रेत गाठीभेटी आणि संवादास उस्फूर्त प्रतिसाद

खडकवासलाः खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे महायुती मधील भाजपचे उमेदवार आमदार भीमराव तापकीर यांनी वारजे ते रामनगर भागात निवडणुकीच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात  प्रतिसाद देत आशीर्वाद दिला.

नुकताच मंजूर झालेला नळस्टॉप ते माणिकबाग मेट्रो जोड मार्ग, नुकताच भूमिपूजन झालेला वारजे ते वडगाव सेवा रस्ता, याच्याशिवाय मतदारसंघात झालेली विविध विकास कामांची माहिती देऊन नागरिकांना पुन्हा भाजप-महायुतीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

पदयात्रेत नागरिकांचा मोठ्या संख्येने मिळालेला प्रतिसाद पाहून 23 तारखेला खडकवासला मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित असल्याची खात्री असल्याचे तापकीर यांनी सांगितले. या भव्य पदयात्रेत भाजपा शहराध्यक्ष धीरजजी घाटे, माजी उपमहापौर दिलीप बराटे प्रामुख्याने सहभागी झाले. तसेच परिसरातील महायुतीचे माजी नगरसेवक, वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सौर ऊर्जा प्रकल्पामुळे वीज बिल 1000 रुपयावर
वारजे माळवाडी येथील सुयोगओरा ए, वसुधाइतिषा,  अतुलनगर ए, अतुलनगर बी, ईशाननगरी, ईशान संकुल, आणि राहुल पार्क या सोसायटीमध्ये एक कोटी 10 लाख रुपये खर्चाचा प्रकल्पआमदार निधीतून  उभारला आहे. या योजनेत सोसायटीची 25 टक्के लोक वर्गणी आणि 75 टक्के आमदारांच्या विकास निधीतून योजना राबवली. त्यामुळे सोसायटीतील सार्वजनिक वीज वापर सौर ऊर्जेतील विजेतून होत आहे. सुमारे 250 सदनिका असलेल्या सोसायटींचे सार्वजनिक वीज बिल खर्च मासिक 50 हजारांपेक्षा जास्त होता. सर्व सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत आता वीज बिल दरमहा फक्त एक हजार रुपये येत आहे असे येथील सदनिका धारकांनी सांगितले. वारजे येथील विठ्ठल नगर ते आपटे सोसायटी परिसरात अधिक क्षमतेची सांडपाणी वाहिनी टाकण्यात आली. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अडीच कोटी रुपये निधी आणला. सामान्य नागरिकांचा प्रश्न त्यामुळे सुटला असे तापकीर यांनी यावेळी सांगितले.

See also  नागरिकांशी जनसंवाद कार्यक्रमाचे पोलीस स्टेशन अंतर्गत आयोजन करण्यात यावे नाना वाळके यांची मागणी