ॲपल फाऊंडेशनच्या वतीने मोफत सांगीतिक मेजवानी यजुर्वेद बॅंड च्या कलाकारांनी पुणेकरांना केले मंत्रमुग्ध

पुणे : ॲपल फाऊंडेशनच्या वतीने ‘सणासुदीची भेट उद्देशपूर्ण साजरी करा!’ या टॅग लाइन द्वारे सणासुदीत आनंद आणि समाजसेवेचा उत्सव एका सांगीतिक मैफली च्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. संगीतातून समाजसेवेची नवचेतना जागविण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात यजुर्वेद बॅंड च्या कलाकारांनी पुणेकरांना मंत्रमुग्ध केले.

बोगनवेल फार्स, म्हात्रे ब्रिज, डी.पी. रोड , एरंडवणे येथे आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, ॲपल फाऊंडेशनच्या अध्यक्षा नयना चोपडे, आयोजक डिंपल चोपडे, ओजस चोपडे आदि मान्यवर उपस्थित होते.

नयना चोपडे म्हणाल्या, गेली 32 वर्ष मी सलोन व्यावसायात आहे. तर गेल्या सात वर्षा पासून आम्ही  ॲपल फाऊंडेशन चालवत आहोत. या मार्फत आम्ही पहिली तीन वर्ष महिला साक्षमीकरणावर काम केलं. तर पुढची तीन वर्ष आम्ही मुलांच्या शिक्षणावर भर देत काम केले. मावळ तालुक्यातील दुर्गम अशा 13 गावांमध्ये मुलांना शाळेत जाण्यासाठी मोफत सायकल वाटप केले. तसेच मागच्या वर्षी ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी काम केलं. यावर्षी आम्ही ज्येष्ठ  नागरिकांसाठी काम करत आहोत. या अंतर्गत आम्ही विविध ठिकाणी  शाखा सुरू करणार आहोत, जेथे ज्येष्ठ व्यक्तींचा वेळ पण जाईल अन् त्यांना काही उत्पन्न पण मिळू शकेल. सलोन ऍपल, 1993 A Salon Company , फिलिट इनस्टिट्यूट आणि कस्तूरी स्पा  अशा आमच्या चार कंपन्या आहेत. ज्याचा सीएसआर फंड असतो त्या अंतर्गत हे उपक्रम केले जात आहे. याशिवाय आम्ही यंदा शेतकऱ्यांना बिबीयांनांच वाटप, टेकड्यांवर वृक्षारोपण असे उपक्रम देखील राबवले आहेत. विशेष म्हणजे गेली सात वर्ष आम्ही कॅन्सर पेशंटला ‘हेअर टूडे होम टुमारो’ या कॅंपेन खाली मोफत वीग वाटप करत आहोत.

डिंपल चोपडे म्हणाल्या, माझ्या आईने सात वर्षांपूर्वी या ॲपल फाऊंडेशनची स्थापना केली आहे. आता आईच्या वतीने आम्ही दरवर्षी काहीना काही सामाजिक काम करत असतो, आमच्या प्रमाणे येथील कर्मचाऱ्यांना देखील आता सामाजिक कामाची आवड निर्माण झाली आहे.

चंद्रकांत दादा पाटील यांनी ॲपल फाऊंडेशनच्या कामाचे कौतुक करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

See also  लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्जरामटेकमध्ये २४०५ तर नागपूरमध्ये २१०५ मतदान केंद्रे