पाषाण येथील संत गोरा कुंभार हायस्कूल पुन्हा सुरू करणार- चंद्रकांत मोकाटे

पाषाण : पाषाण मधील सर्व सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या संत गोरा कुंभार हायस्कूल हे पुन्हा सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून हे हायस्कूल सुरू करणार असे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी सांगितले.

पाषाण परिसरातील हजारो विद्यार्थी संत गोरा कुंभार हायस्कूलमध्ये शिले आहेत. अनेक जण उच्च पदांवर कार्यरत आहेत. या परिसरातील चांगले सुरू असलेले हायस्कूल बंद पाडण्याचा प्रशासनाने घाट रचला आहे. हे हायस्कूल सर्व सामान्य नागरिकांसाठी आवश्यक असताना देखील बंद करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सर्व सामान्य नागरिकांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार आहे.

संत गोरा कुंभार हायस्कूल पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी फार मोठा लढा दिला आहे. परंतु राजकीय व प्रशासकीय अनास्थेमुळे याला फारसे यश येताना दिसत नाही.‌ गेले काही महिन्यांपासून हायस्कूल सुरू करण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू करण्यात आला असून लवकरच हे हायस्कूल पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी ग्रामस्थ व मी प्रयत्नशील असल्याचे चंद्रकांत मोकाटे यांनी सांगितले.

शासन स्तरावर सुरू असलेले शिक्षण आरोग्य तसेच अन्य सुविधा या कायमस्वरूपी ठेवून त्या अधिक सक्षम करण्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. भविष्यात देखील नागरिकांना या सुविधांचा फायदा घेता यावा यासाठी महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रयत्न करेल असे चंद्रकांत मोकाटे यांनी सांगितले.

See also  गोखले नगर परिसरातील पूरग्रस्त घरांच्या वाढीव बांधकामावरील कराला स्थगिती नको तर तो रद्द करा - निलेश निकम