खडकवासलाःसिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी आतकरवाडी रस्त्यावरून काल गुरुवारी 14 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेपाच सहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या गव्हर्मेंट काॅंट्रॅक्टर असलेल्या. व्यवसायिकाचे खंडणीसाठी अपहरण केले असल्याची धक्कादायक घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांना एका संशयित आरोपीस अटक करण्यात यश आले आहे.
विठ्ठल सखाराम पोळेकर (वय 70 रा. पोळेकर वाडी, सिंहगड पायथा, ता. हवेली) असे अपहरण झालेल्या व्यवसायिकाचे नाव असून ऐन निवडणुकीच्या धामधुमीत घडलेल्या या घटनेमुळे हवेली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
विठ्ठल पोळेकर नेहमीप्रमाणे काल मॉर्निंग ऑकसाठी पहाटे पाच साडेपाचच्या दरम्यान घराबाहेर पडले होते. घरापासून सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत ते मॉर्निंग वॉकसाठी जात असतात. त्यानंतर ते सकाळी दहा वाचून गेले तरी घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली परंतु विठ्ठल पोळेकर आढळून न आल्याने त्यांची मुलगी सोनाली विठ्ठल पोळेकर यांनी अपहरणाची फिर्याद दाखल केली.फिर्यादीनुसार पोलिसांनी योगेश उर्फ बाबू किसन भामे आणि योगेश किसन भामे (रा.डोणजे ता.हवेली ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून योगेश भामे यास अटक करण्यात यश आले आहे. आरोपींचा आणि अपह्रृत व्यक्तीचा शोध घेण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पाच पथके तयार केली असून शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी रवाना केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विठ्ठल पोळेकर हे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर असून त्यांना व त्यांचा मुलगा प्रशांत यांना आरोपी योगेश भामे याने दोन वर्षांपूर्वी त्यांना मिळालेल्या रस्त्याचे काम पूर्ण करू देण्यासाठी जग्वार गाडीची मागणी केली होती. ती त्यास न दिल्यामुळे त्याने मुलगा प्रशांत पोळेकर यास दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, त्याचे पैसे आरोपीस न दिल्याचे कारणावरून आरोपी योगेश भामे आणि त्याचे बीबी बॉईज या टोळीतील साथीदारांसह मिळून विठ्ठल पोळेकर वॉकिंगला गेल्यानंतर अपहरण केले.
अपह्रृत व्यक्तीच्या जीवीतास कोणताही धोका न होता मिळवणे हे आव्हान असून आरोपींचे मोबाईल लोकेशन व वाहनांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके नाशिक येथे व एक पथक सोलापूर पुणे हायवे च्या दिशेने रवाना केले असून हवेली पोलीस ठाण्याकडील दोन पथके तयार करून आम्ही स्वतः यातील आरोपींचा व अपहरित व्यक्तीचा हवेली, पौड व लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमधील हॉटेल लॉजेस व फार्म हाऊस चेक करून शोध घेत आहोत.
अपह्रृत व्यक्तीच्या जीवीतास कोणताही धोका न होता मिळवणे हे आव्हान असून आरोपींचे मोबाईल लोकेशन व वाहनांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके नाशिक येथे व एक पथक सोलापूर पुणे हायवे च्या दिशेने रवाना केले असून हवेली पोलीस ठाण्याकडील दोन पथके तयार करून आम्ही स्वतः यातील आरोपींचा व अपहरित व्यक्तीचा हवेली, पौड व लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमधील हॉटेल लॉजेस व फार्म हाऊस चेक करून शोध घेत आहोत.-रमेश चोपडे, अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
–रमेश चोपडे, अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण