मुळशी तालुक्यातील नागरिकांनी बैठक घेऊन दिला शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना पाठिंबा

कोथरूड : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना मुळशी तालुक्यातील नागरिकांनी गांधी भवन येथे झालेल्या एका बैठकीत पाठींबा दिला. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून विकासाची कामे कोथरूडमध्ये चांगल्या पद्धत करण्याचा निर्धार या स्नेह मेळाव्यात करण्यात आला.


कोथरूड येथील गांधी भवनाच्या मैदानात शुक्रवारी सायंकाळी मुळशी तालुक्यातील नागरिकांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. ऍड स्वप्निल तोंडे पाटील, सीताराम तोंडे पाटील ज्योती सूर्यवंशी, ज्ञानेश्वर डफळे, उमेश कंधारे आदींनी या मेळाव्याच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता. यावेळी महात्मा गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे, विकास पासलकर, अन्वर राजन, कालिंदी गोडांबे,आरती करंजावणे, मनिषा भोसले, संगीता पवळे, विकास साबळे आदी उपस्थित होते.


डॉ सप्तर्षी मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की , श्री मोकाटे यांनी चांगली विकासकामे केली आहेत. त्यांनाच मुळशीकरांनी निवडून द्यावे. तरच कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा विकास होईल. महायुती सरकार भाजपला बहुमत दिल्यास निवडून आल्यानंत ते काही दिवस कामकाज करतील. अशी भिती व्यक्त करून त्यांचा स्वार्थ पूर्ण झाला की, ते lमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही बाजूला करतील अशी भिती डॉ सप्तर्षी यांनी व्यक्त केली. लोकशाहीतील मतदानाचा अधिकार नागरिकांनी योग्य उमेदवारासाठी बजावला तरच लोकशाही टिकेल.


चंद्रकांत मोकाटे म्हणाले की, मुळशी तालुक्यातील अनेक रहिवासी कामानिमित्त पुण्यात येतात. त्यांच्यासाठी शौचालायची व्यवस्था नव्हती. आपण आमदार फंडातून बांधली. काहीजण काम तर करत नाही पण फ्लेक्स लावून खोटी प्रसिद्धी करून घेतात. या परिसरात मोठे हॉस्पिटल नाही रुग्णांची व नागरिकांची गरज लक्षात घेऊन मी मोठे हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कडून निधी मंजूर करून आणला.मी आमदार नसल्यामुळे पण ते काम होऊच शकले नाही.
विकास पासलकर म्हणाले की, मुळशीकरानी मोकाटे यांना पाठिंबा देऊन कोथरूडचा विकास करण्याची संधी दयावी.

See also  पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण कार्यक्रमांतर्गत खेळाडूंना मिळणार आर्थिक साहाय्य