माॅडर्न महाविद्यालय गणेशखिंड “दादाची शाळा” या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डी.ई.ए.फंड ‘रिझर्व बँक आँफ ईंडियाच्या अंतर्गत “आर्थिक साक्षरतेची” कार्यशाळा

आकुर्डी : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे माॅडर्न महाविद्यालय गणेशखिंड “दादाची शाळा” या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डी ई ए फंड ‘रिझर्व बँक आँफ ईंडियाच्या अंतर्गत  “आर्थिक साक्षरतेची” कार्यशाळा आयोजित केली होती.
या कार्यशाळेत श्री सदानंद दिक्षित, एक्स सीईओ पुणे पीपल्स को-आॅपरेटिव्ह बँक व श्री बिपीन देवकर, ईपीडब्ल्यूआर, मुंबई यांनी मार्गदर्शन केले.

श्री दिक्षित यांनी उत्पन्न, खर्च व बचत यांचे  प्रमाण सांगितले. ते म्हणाले,” १०० रुपयातील २० रुपये बचत म्हणून ठेवा. लहान वयातच बचतीची सवय करा. उत्पन्न असेल तरच खर्च करा.” श्री देवकर यांनी ” रिझर्व बँक व सरकारच्या योजना, लोकपाल व ईतर स्किम यावर विद्यार्थ्यांशी चर्चा केली.”

श्री अक्षय गोंदकर  मॅनेजर, रिझर्व बँक आॅफ ईंडिया यांनी आर्थिक साक्षरतेची माहिती दिली.सायबर फ्राॅड आणि डिजिटल बँकिंगची माहिती त्यांनी दिली व यशस्वी कार्यक्रमासाठी अभिनंदन केले.दादाच्या शाळेतील कार्याची माहिती देताना अमोल शिंदे म्हणाला, या मुलांना आम्ही शिक्षण आणि शिस्त हे दोन्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या १० वर्षात शाळेची खुप प्रगती झाली आहे. श्री अभिजित पोखर्णीकर यांनी या शाळेतील मुलांना मदतीची गरज आहे. आर बी आयचा मदतीचा हात जर मिळाला तर अजून मुले शिक्षणाच्या प्रवाहात येतील असे सांगितले.
बँक आॅफ महाराष्ट्राच्या आकुर्डी शाखेने विद्यार्थ्यांचे अकाउंट ओपन करुन दिले. हा तिसर्या टप्प्यातील १३ कार्यक्रम अतिशय छान पार पडला. कार्यक्रमात मुलांना बचतीची सवय लागावी म्हणून पिगी बँक देण्यात आली. एफ बी एफ च्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.

कार्यक्रमाचे समन्वय डाॅ मंजुषा कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक प्रा विजया कुलकर्णी यांनी केले. बँकेची शपथ श्रध्दा कुलकर्णी हिने घेतली.

See also  आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायिका सुषमा देवी यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचा पुढाकार