छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघांचा कायापालट करणार – मनिष आनंद

पुणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्यात आला आहे. छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वराज्य पक्ष पुरस्कृत, अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांनी प्रत्यक्ष गाठीभेटी आणि पदयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे, त्यांच्या पदयात्रा आणि रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मनिष आनंद यांनी आज छत्रपती शिवाजीनगर मधील निलज्योती सोसायटी पासून आपल्या पदयात्रेची सुरुवात करत रामोशीवाडी येथे या पदयात्रेचा समारोप झाला.

यावेळी नागरिकांशी संवाद साधताना मनिष आनंद म्हणाले, गेल्या १० वर्षांतील भाजपच्या निष्क्रियतेमुळे शिवाजीनगर मतदारसंघातील नागरी प्रश्न अधिक बिकट बनले, प्रंचड वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, अपूरा पाणीपुरवठा, कचऱ्याचे ढीग, वाढती गु्न्हेगारी, प्रदुषण अशा नागरी प्रश्नांनी छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे नुकसान झाले आहे. त्यामुळेच आता छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघात परिवर्तन होणे गरजेचे आहे. चतुःश्रृंगी परिसरात पाण्याची मोठी टाकी असतानाही मतदारसंघातील अनेक भागांत केवळ तीन ते चार तास पाणीपुरवठा होतो. काही परिसरात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. ही परिस्थिती बदलून शिवाजीनगरमधील प्रत्येक नळास २४ तास समान पाणीपुरवठा करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघांचा कायापालट करणार असल्याचेही मनिष आनंद यांनी सांगितले.

See also  बारामती मतदारसंघातील मतदार याद्या गुजरातमध्ये तयार झाल्या? गुजराती लिपीमध्ये मध्ये मतदारांची नावे सापडली