शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूलमध्ये कॅमेरा प्रणालीचे उद्घाटन

कर्वेनगर  : कर्वेनगर – वारजे पुणे मनपाची भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल उभारली आहे. या शाळेत मुलांचा शैक्षणिक आणि शारीरिक असा सर्वांगीण विकास होत असताना या चिमुकल्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करत  तब्बल दहा लाख रुपये निधी मंजूर करून या निधीतून अत्यंत उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेरा प्रणालीचा उद्घाटन सोहळा माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने आणि शालेय शिक्षण मंडळाच्या अधिकारी अपर्णा राईजं  यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

आज राज्यासह देशभरात अनेक भयावह आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत असताना त्यांना निर्बंध घालण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही कटीबद्ध आहोत. हेच कर्तव्य डोळ्यांसमोर ठेवून शाळेच्या साडेतीन एकर परिसरात तब्बल चौदा कॅमेरे बसवण्यात आले असून यामुळे विद्यार्थी वर्गाच्या सुरक्षेत भर पडणार आहे. यावेळी उपस्थित पालक वर्गाने कॅमेरांचा दर्जा पाहत समाधान व्यक्त केले. नागरिकांच्या या सकारात्मक प्रतिक्रिया ही खऱ्या अर्थाने आमच्यासाठी ऊर्जा असून भविष्यात सर्वच शाळांमध्ये मुलांची सुरक्षा अग्रक्रमी गणली जावी असे स्वप्निल दुधाने यांनी सांगितले.

याप्रसंगी माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाने, शाळेच्या मुख्याध्यापिका लीना देशमुख मॅडम, शिक्षक वृंद, पालक वर्ग, माझे सहकारी मित्र श्री. गिरीशजी गुरनानी, श्री. विष्णूजी सरगर, कौशल चौधरी, स्कुल पालक कमिटीचे अध्यक्ष श्री. महेशजी कनेरकर व कमिटी मेंबर, श्री. पियुषजी हणवंते व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धन्यवाद

See also  'उत्कृष्ठ फिश डिसिज डायग्नोस्टिक लॅब' या महाराष्ट्र शासानाच्या पुरस्काराने माॅडर्न महाविद्यालय गणेशखिंड सन्मानित