जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव मावळ येथील विद्यार्थ्यांचा सायबर सिक्युरिटी चर्चासत्रात सहभाग

खामगाव मावळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव मावळ येथील विद्यार्थ्यांनी ‘बाल रक्षा भारत’ आणि ‘नॉर्टन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायबर सिक्युरिटी चर्चासत्रात सहभागी होऊन एक महत्त्वपूर्ण अनुभव घेतला. या चर्चासत्रात देशभरातील आठ राज्यांमधील विविध विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

सायबर सिक्युरिटी या विषयाचा वाढता महत्त्व लक्षात घेऊन या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.इंटरनेट आणि मोबाईलचा वापर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि चुकीच्या वापरामुळे येणाऱ्या अडचणी कशा टाळता येतील, यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः लहान मुलांसाठी सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यात आले.या कार्यक्रमात सेव्ह द चिल्ड्रन संस्थेचे श्री. हनुमंत पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुरक्षा राखण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय सांगितले. उदाहरणार्थ, पासवर्ड सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व, अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संवाद टाळणे, सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करताना खबरदारी घेणे, आणि ऑनलाइन फसवणूक कशी ओळखावी यावर सखोल चर्चा केली.


विद्यार्थ्यांनी या चर्चासत्रात उत्साहाने सहभाग घेतला आणि तज्ज्ञांकडून समर्पक उत्तरांची माहिती मिळवली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. उमेध धावारे यांनी आणि शिक्षकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. ग्रामीण भागातील मुलांना अशा जागतिक चर्चासत्रात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने त्यांच्यात आत्मविश्वास वाढल्याचे त्यांनी नमूद केले.


‘बाल रक्षा भारत’ आणि ‘नॉर्टन’ यांच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर जागरूकता निर्माण झाली असून, ते इंटरनेटचा सुरक्षित आणि सकारात्मक वापर करण्यासाठी सजग होणार आहेत. हनुमंत पवार यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रात सहभागी होण्याची संधी मिळाली, हे विशेष.

See also  कोथरूडमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरोघरी संपर्काला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद