बांगलादेशी इस्कॉन संघटनेच्या सदस्यांविरोधात तेथील सरकार हल्ले, अत्याचार करत असल्याच्या निषेधार्थ बालगंधर्व चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने धरणे आंदोलन

पुणे : बांगलादेशी इस्कॉन या मानवतावादी, अध्यात्मिक संघटनेच्या सदस्यांविरोधात तेथील सरकार हल्ले, अन्याय व अत्याचार करत असल्याच्या निषेधार्थ आज झाशीराणी पुतळा, बालगंधर्व चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे शहराचे वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

तसेच बांगलादेशचा झेंडा पायदळी तुडवून व जाळून निषेध करण्यात आला. भारतीयांवर बाहेर देशांमधील वाढते अत्याचार हल्ले थांबविण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरले आहे, शिवसेना पुणे शहराच्या वतीने यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली, मोदी सरकारची लाडकी बहीण … शेख हसीना … शेख हसीना” ही घोषणा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. मोदी भक्तांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान मोदींच्या एका फोनमुळे रशिया – युक्रेनचे युध्द थांबले. मग बांगलादेशात हिंदूंवर होणारे हल्ले, अन्याय, अत्याचार थांबवण्यासाठी भक्तांनी दुसरा फोन करण्यासाठी पंतप्रधानाकडे आग्रह धरावा. फक्त निवडणुकीपुरते हिंदुत्व करायच नंतर पुर्णपणे दुर्लक्ष करायच हि भाजपची निती. बांगला देशातील हिंदूवरील हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत बांगला देशासोबत क्रिकेट बंद करा हि शिवसेना नेते आ आदित्य ठाकरे यांची मागणी अमलात आणा असे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.

बांगलादेशी हिंदूंविरोधातील अत्याचार थांबले नाही तर शिवसेना महाराष्ट्रात व पुणे शहरात विविध भागात उग्र आंदोलन करणार आणि झोपलेल्या केंद्र सरकारला जागे करणार आहे असे आंदोलनात ठरविण्यात आले.
यावेळी धरणे आंदोलनात शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकूडे, विजय देशमुख, प्रशांत बधे, रामभाऊ पारिख, राजेंद्र शिंदे, संतोष गोपाळ, दत्ता घुले, उपशहप्रमुख भरत कुंभारकर, प्रशांत राणे, राजेश पळसकर, आबा निकम, उमेश वाघ, उत्तम भुजबळ, बाळासाहेब भांडे, अनंत घरत, प्रविण डोंगरे, विलास सोनवणे, दिलीप पोमण, संतोष भुतकर, नंदू येवले, राजेश मोरे, राजेंद्र शहा, भगवान वायाळ, मुकुंद चव्हाण, अमर मारटकर, रूपेश पवार, प्रसाद काकडे, सचिन चिंचवडे, अजय परदेशी, संतोष तोंडे, राजू चव्हाण, हेमंत यादव, दिलीप व्यवहारे, दत्ता खवळे, नितीन निगडे, नागनाथ शिंदे, आशिष आढळ, संतोष होडे, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, समन्वयक युवराज पारिख, चेतन चव्हाण, अजित जाधव, सोहम जाधव, शुभम दुगाणे, कुणाल झेंडे, तेजस मर्चंट, सागर दळवी, चिंतामणी मुंगी, बकुळ डाखवे, प्रतीक गालिंदे, नागेश खडके, अमित जाधव, शैलेश जगताप, महिला आघाडीच्या कल्पना थोरवे, विद्या होडे, रोहिणी कोल्हाळ , स्वाती कथलकर, करुणा घाडगे, प्रविणी भोर, ज्योती चांदेरे, सोनाली जुनवणे, शितल जाधव, स्नेहल पाटोळे, राजेश मुप्पीड, विनायक नांगरे, सूर्यकांत पवार, नितीन रावळेकर, अरविंद दाभोळकर, बाबा कोरे, सोमनाथ गायकवाड, नितीन जाधव, सचिन खेंगरे, शाम कदम, आनंद वाघमारे, सचिन घोलप, प्रकाश चौरे, प्रकाश धामणे, प्रभाकर कुंटे, विकी धोत्रे, राहुल शेडगे, संजय लोहोट, संतोष ओरसे, अफाक शेख, जुबेर शेख, मंदार धोत्रे, धीरज शिंदे, असीम शेख, जुबेर तांबोळी , प्रशांत काकडे, अथर्व लांडगे, अनिल हावळे इतर शिवसैनिक उपस्थित होते.

See also  ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्हचे पुण्यात प्रथमच आयोजनउद्योग-व्यवसाय विस्तार आणि परदेशी गुंतवणुकीच्या संधींविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन