वाघोलीच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार माऊली कटके यांचा पुढाकार मनपा आयुक्तांची भेटली भेट

पुणे : आमदार माउली आबा कटके वाघोलीचा समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर पुणे महानगर पालिका आयुक्त डॉक्टर  राजेंद्र भोसले साहेबांची भेट घेत वाघोली परिसरातील समस्या बाबत चर्चा केली.

वाघोलीचा रस्ते ,पानी ,ड्रेनेज ,ट्रॅफिक तसेच इतर अनेक स्थानिक समस्या सोडविण्यासाठी माउली कटके यांनी स्थानिक नेत्यांसमवेत महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांची भेट घेतली व  लवकरच महानगर पालिकेचे सर्व विभागाचे अधिकारी तसेच पीएमआरडीए ,सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी ),विद्युत विभाग या सर्वांची एकत्रित मिटिंग घेऊन कामे लवकर मार्गी लावण्यासाठी आयुक्तांना निवेदन दिले.

आयुक्तांनी यावर लवकरच सर्वांची एकत्रित मिटिंग घेऊन वाघोलीचा सर्व समस्या सोडविण्यासाठी प्राध्यान देण्यासाठी सकारात्मकता दर्शिवली.

See also  नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान