पुणे : देशातील अन्य उद्योग, व्यवसायापेक्षा बांधकाम व्यवसायात वाढीचा वेग अधिक आहे. भारतात आज साधारणात 20 टक्के व्यवसायवृद्धीचा दर बांधकाम क्षेत्रात आहे, भविष्यात यात अधिक वाढ होईल. यामुळे पुरुष प्रधान समजल्या जाणाऱ्या बांधकाम व्यवसायात अधिकाधिक महिलांनी आले पाहिजे असे मत नॅशनल रिअल स्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO/ नरडेको) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांनी केले.
नॅशनल रिअल स्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO/ नरडेको) माहीची स्थापना केली आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, सर्व क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च संस्था आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील महिला उद्योजकांना त्यांच्या महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी ‘माही’ व्यासपीठाची स्थापना करण्यात आली आहे. हॉटेल शेरटॉन ग्रॅण्ड येथे ‘नरडेको माही’ आयोजित ‘अध्यक्ष पदभार स्विकारण्याचा सोहळा’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानवरून हिरानंदानी बोलत होते. यावेळी शेखर सिंह (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका), नेरडेको चे जी. हरिबाबू, राजन बांदेलकर, अपेक्षिता तिपसे (महाव्यवस्थापक, कॉसमॉस बँक) डॉ. विद्या येरवडेकर (प्र. कुलगुरू, सिम्बायोसिस विद्यापीठ), देव गिल (प्रसिद्ध अभिनेते ), नवनिर्वाचित अध्यक्ष स्मिता पाटील, मावळत्या अध्यक्षा अनंता रघुवंशी, नरडेको पुणेचे अध्यक्ष भरत अग्रवाल आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना निरंजन पुढे बोलताना निरंजन हिरानंदानी म्हणाले, रोटी कपडा और मकान या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, मात्र आजही अनेकांचे हक्काचे घर झालेली नाही यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली परवडणाऱ्या दरात घर देण्यासाठी नरडेको वचनबद्ध आहे. आज मुंबई सारख्या शहरात जबाळपास पन्नास टक्के नागरिक झोपडपट्टी भागात राहतात, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी येत्या 10 वर्षांचा प्लॅन आम्ही सरकारला देणार आहोत, जेणेकरून मुंबई झोपडपट्टी मुक्त होईल आणि सर्वांना परवडणारी घरे मिळतील. माही च्या माध्यमातून बांधकाम व्यवसायत अधिकाधिक महिलांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करणार, त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार असल्याचेही हिरानंदानी यांनी नमूद केले.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, बांधकाम व्यवसायातील राष्ट्रीय पातळीवरील सनआस्थेने महिलांसाठी केवळ स्वतंत्र विंग सुरू करून थांबू नये, बांधकाम क्षेत्रातील महिला मंजुरांची संख्या लक्षणीय आहे, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांना यथायोग्य मंजूरी देण्यासाठी प्रयत्न करावेत. आज देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत, आपल्या महाराष्ट्रात मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि मुख्य वनसंरक्षक अशा तीनही महत्वाच्या पदावर महिला आहेत यामुळे केवळ माही नाही तर नरडेको च्या अध्यक्षपदी महिला बांधकाम व्यावसायिक आल्या पाहिजे असे मत व्यक्त केले.
माहीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा स्मिता पाटील म्हणाल्या, बांधकाम व्यवसायात महिलांचा सहभाग वाढविणे, मजूर महिलांचे प्रश्न सोडवणे या गोष्टी तर आम्ही करणार आहोतच, मात्र पर्यावरण पूरक घरांच्या निर्मितीसाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.
राजन बांदेलकर म्हणाले, बांधकाम क्षेत्र पुरुष प्रधान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव, बेटी पढाव असा नारा दिलेला आहे. मेडिकल, फायनान्स सह अन्य क्षेत्रात महिलांची संख्या मोठी आहे, मात्र बांधकाम व्यवसायात ती तुलनेने फार कमी आहे. महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी चार वर्षांपूर्वी माहीची स्थापना झाली आहे, आज एक मराठी महिला माहीची राष्ट्रीय अध्यक्ष होतेय याचा आनंद वाटतो.
याप्रसंगी नेरडेको चे जी. हरिबाबू, अपेक्षिता तिपसे, डॉ. विद्या येरवडेकर, देव गिल, अनंता रघुवंशी, भरत अग्रवाल यांनीही आपले मनोगत व्यक्त करत नरडेको माहीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.