पुणे : पर्यावरणाला हानी न पोहचवता शाश्वत विकासासाठी काय करायला पाहिजे हे जाणून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘क्लायमेट एक्सचेंज – ग्रीन एक्स हॅकेथॉन’ स्पर्धेला पुणेकरांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये अभियंते, शेतकरी, वकील, बँकर्स आणि अन्य क्षेत्रातील तज्ज्ञ यांचा समावेश होता. या स्पर्धेत प्रामुख्याने शहरातील कचरा, ऊर्जा, समुद्री प्रणाली, बायोफ्यूल पर्याय यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स हॉल मध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत पर्यावरण बदलाच्या समस्यांसाठी प्रभावी उपाय तयार करण्याचा उद्देशाने अनेक संस्था, व्यक्तींनी आपले प्रकल्प सादरीकरण केले. स्पर्धेचे आयोजन मूळचे पुणेकर आणि सध्या कॅनडा मध्ये पर्यावरण बादलांनावर संशोधन करत असलेल्या करण चव्हाण यांच्या ईकोआईस (ECOICE) या संस्थेने केले होते. चव्हाण यांनी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मधून पीएचडी केलेली आहे.
या स्पर्धेचे परीक्षण मॅरिटाइम रिसर्च सेंटरचे संस्थापक डॉ. (कमांडर) अर्नब दास, , आणि सॉलिड रॉकेट प्रपेलंट डिव्हिजन डीआरडीओ मधील शास्त्रज्ञ डॉ. सुधीर सिंग यांनी केले.
यावेळी बोलताना करण चव्हाण म्हणाले, आमची ईकोआईस कंपनी सध्या कॅनडामध्ये भारतीय संशोधन आणि तंत्रज्ञान यावर काम करते. कार्बन फुटप्रिंट कमी करण्याचे आपल्यापुढे मोठे आव्हान आहे. आज आपण अनेक शहरांचा विकास करत आहोत, यामध्ये पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावर हानी पोहचते. ती हानी टाळता येणे शक्य नसले तरी किमान कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी आम्ही जगभर उपक्रम राबता आहोत, यातील चांगल्या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.