नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलचे  वार्षिक स्नेहसंमेलन पंचतत्वांवर आधारित पर्यवरणपूरक संदेश देत यशस्वीपणे पार पडले

पिंपरी : नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलचे  वार्षिक स्नेहसंमेलन पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांवर आधारित पर्यवरणपूरक संदेश देत यशस्वीपणे पार पडले. नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलचे  वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आले.

या प्रसंगी  नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसचे संस्थापक अध्यक्ष आमदार अमित गोरखे (विधान परीषद सदस्य ), संस्थेचे कार्यकारी संचालक श्री.विलास जेऊरकर, शाळा व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे, तांत्रिक विभाग प्रमुख  समीर जेऊरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मृदुला गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावर्षीच्या स्नेहसंमेलनाचा मुख्य विषय ‘पंचतत्त्व’ ठेवण्यात आला होता. नॉव्हेल ग्रुपच्या नॉव्हेल किड्स, नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल,नॉव्हेल ज्युनिअर कॉलेज च्या सर्व विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनात सक्रियपणे सहभाग घेतला.


कार्यक्रमाची सुरुवात प्रत्येक पंचतत्त्वाची ओळख करून देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने झाली. विद्यार्थ्यांनी पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांतील प्रत्येक तत्त्वाचे महत्त्व आणि त्यांचे मानवी जीवनाशी असलेले नाते यावर प्रकाश टाकला.
शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट सादरीकरण करून घेतले. ज्यामध्ये पंचतत्त्वांच्या समतोलावर आधारित विविध नृत्य आणि अभिनय सादर करण्यात आले. या नृत्यांद्वारे विद्यार्थ्यांनी पंचतत्त्वांचा आदानप्रदान, त्यांचा समतोल आणि त्यांचे पर्यावरणावर होणारे प्रभाव यांचा सजीव चित्रण केले.कार्यक्रमाच्या दरम्यान, विद्यार्थ्यांनी पंचतत्त्वांचे महत्त्व आणि त्यांची जोपासना कशी करावी यावर पालकांना सखोल माहिती दिली. ज्याद्वारे  विविध सृजनशीलतेची आणि ज्ञानाची चमक दिसून आली. या संवादातून विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयीची जागरूकता आणि त्याचे महत्त्व कसे समजून घेतले जाते, हे दिसून आले.


वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकतर कर्मचारी , सहकारी पालकवर्ग यांचा मोठा सहभाग होता. या स्नेहसंमेलनाच्या आयोजनाने शाळेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची पुन्हा एकदा आठवण करून दिली, आणि विद्यार्थ्यांमध्ये पंचतत्त्वांच्या महत्त्वावर आधारित सकारात्मक विचारांची बीजं रुजवली गेली.

See also  मंत्री महोदय चंद्रकांत पाटील यांना स्वतःच्या निधीतून रस्त्यावरचे खड्डे बुजवावे लागतात ही शोकांतिका - उज्वल केसकर ; शिवाजीनगर किंवा कोथरूड मधून लढण्याची तयारी