अमोल बालवडकर फाउंडेशन च्या वतीने ‘मिशन निर्मल’ अभियान चा दुसरा टप्पा पाषाण सुसरोड सुतारवाडी लम्हाणतांडा परिसरात सुरू

पाषाण :  – पाषाण सुस रोड परिसरामध्ये अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने मिशन निर्मल अंतर्गत सुस रोड परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

सुस मेन रोड श्री तेज अपार्टमेंट, लेण्याद्री सोसायटी, बिगिनर्स वर्ल्ड प्री-स्कूल अँड डे केअर, श्री लेण्याद्री हाऊसिंग सोसायटी, विनायक बंगला, महाराजा फर्निचर डेकोर, ए टू झेड कार केअर, इस्राक कार केअर, भाजपा कार्यालय (रोहन रोहिदास कोकाटे), धनश्री फर्निचर मॉल, शिवांजली रेस्टॉरंट अँड बार, चापाजी बुवा मित्र मंडळ, मॉन्टव्हर्ट आर्केड, शैलजा, चंद्रवर्षा, शुभतेज गार्डन मंगल कार्यालय आदी ठिकाणी अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मिशन निर्मल स्वच्छता अभियानांतर्गत साफसफाई करण्यात आली.

यावेळी परिसरातील नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे या अभियानात सहभागी होऊन आपले योगदान दिले आणि स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळी अमोल बालवडकर यांनी नागरिकांचे प्रबोधन करत आपल्या परिसरातील स्वच्छता राखण्याचे आवाहन केले. तसेच कचरा व्यवस्थापनासाठी कचऱ्याचे डबे वाटप करण्यात आले.

सुस रोड परिसरातील पादचारी मार्गावरील कचरा तसेच रस्त्यावरील पायावरील स्वच्छ करण्यात आला तसेच फुटपाथ वर वाढलेली झाडी यावेळी काढण्यात आली.

See also  महाविद्यालयीन युवकांनी ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन