पुणे : अंतरविभागीय योगासन स्पर्धा २०२३सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व गणेशखिंड येथिल माॅडर्न महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील ‘ ईनडोअर हाॅल’ येथे अंतरविभागीय योगासन स्पर्धा पार पडली.
आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत विजयी झालेले खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र ठरले.या कार्यक्रमाचे उद्घाटन डाॅ दत्ता महादम क्रीडा मंडळ सदस्य सावित्रीबाई फुले पुणे यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी बोलताना डॉ. दत्ता महादम म्हणाले ” गेल्या दोन वर्षांत सावित्री बाई फुले पुणे विद्यापिठाचा संघ पहिल्या दोन विजेत्यांमध्ये असतो तीच परंपरा या ही वर्षी राखण्याचा प्रयत्न खेळाडूंनी करावा व विद्यापीठाचा दर्जा राखावा.”
तसेच या प्रसंगी उपस्थित असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय योग मार्गदर्शक ‘ मा. डॉ. पल्लवी कव्हाने म्हणाल्या, “योग हा फक्त सराव म्हणून , स्पर्धा म्हणून किंवा २ किंवा ३ तास न करता तो आयुष्याचा अविभाज्य भाग बनवा. योग जिवनशैली म्हणून स्वीकारावी. तरच आपण नैसर्गिक जीवनाकडे वाटचाल करू.”
हि स्पर्धा पुणे जिल्हा, नाशिक, नगर व पुणे शहर अशा चार विभागातील अंतरमहाविद्यालीन विजयी झालेल्या संघातून घेतली जाते. या वेळी आठ संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यातून सहा खेळाडू निवडले जाऊन ते अंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये खेळतील असे डाॅ दीपक शेंडकर, क्रिडा संचालक, माॅडर्न महाविद्यालय यांनी सांगितले.एकुण ४५ विद्यार्थी ८ संघात होते. त्यातुन ६ मुले व ६ मुली निवडले जाऊन पुढे ते विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील.
डॉ .नामदेव पटांगरे, डॉ. रवी चव्हाण, सौ. मनाली देव, डॉ. पल्लवी कव्हाने या मान्यवरांनी निवड समिती सदस्य म्हणून काम पाहिले.
मा. निखील साबळे, मिस . हेमा शहा, रुपाली पाटील , सुप्रिया चाकोले व वसीम शेख यांनी पंच म्हणून कार्य केले.डॉ .पल्लवी निखारे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
प्राचार्य डाॅ.संजय खरात यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.
पी ई सोसायटीचे सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर व उपकार्यवाह डाॅ प्रकाश दिक्षित यांनी अभिनंदन केले.