पुणे : महानगर पालिकाहद्दीतील रहिवासी असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब भांडे यांनी सांगितले. बाणेर , बालेवाडी येथील झोपडपट्टी विभागात राहणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील महिलांना सुस पाषाण भागात आयोजित केलेल्या मेळाव्यात शासनाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. अल्प उत्पन्न गटातील महिलांच्या सोबत सामाजिक प्रश्नावर त्यांनी व सामाजिक तज्ज्ञांनी संवाद साधला. या महिलांना व कुटुंबीयांना विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून मदत करण्याच्या हेतूने हा मेळावा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते.
भांडे म्हणाले, ‘पुणे महानगराच्या विकास झपाट्याने होत आहे. याचबरोबर राज्याच्या अनेक भागातून नागरिक कामधंद्याच्या निमित्ताने पुणे शहरात वास्तव्यास येत आहेत. त्यांना महानगरपालिका व राज्य शासनाच्या विविध योजनांची पुरेशी माहिती मिळत नाही. त्यामुळे ते यापासून वंचित राहतात. असे होऊ नये म्हणून एक ” विशेष माहिती अभियान” राबविण्यात येणार आहे.
यावेळी महाळुंगे गावचे माजी सरपंच तथा युवा सेना पदाधिकारी मयूर भांडे, सामाजिक विकास तज्ञ नंदकिशोर लोंढे, कार्पोरेट क्षेत्रातील तज्ञ गुलाब तांदळे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसहकारसेना संपर्क प्रमुख पुणे जिल्हा बाळासाहेब भांडे हे होते. युवा सरपंच / युवासेना उपशहरप्रमुख मयुर भांडे यांनी आयोजन केले. अनिकेत बनसोडे, कामगार नेते दत्ता भुरे हे यावेळी आवर्जून उपस्थित होते.
संघटनेचे कार्यकर्ते दत्ता खैरे , संकेत लोंढे , निलेश गुजर , गौरव पाडाळे , संकेत गोपाळ ,महेश भांडे , अनिकेत बनसोडे , यश पाडाळे , करन भांडे , रुतिक भांडे ,संदेश भदर्गे , तन्मय ससार , अविनाश अंबुरे , आदेश भदर्गे , संकेत डेंगळे , अनिरुध्द गवळी , अभिषेक भांडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
उपस्थित महिलांनी या प्रसंगी या उपक्रमाचे स्वागत केले आणि या अभियानाला सर्वाधिक संख्येने पाठिंबा देण्याचे जाहीर केले.
घर ताज्या बातम्या पुणे महानगर पालिका हद्दीतील नागरिकांना शासकीय योजनांच्या लाभाची आवश्यकता : शिवसहकारसेना संपर्कप्रमुख...