प्रभाग क्रमांक ९ सुस–बाणेर– पाषाणमधून भाजपच्या सौ. लक्ष्मी सचिन दळवी यांचा सर्वसाधारण महिला गटातून उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : प्रभाग क्रमांक ९ सुस–बाणेर–पाषाण येथून भारतीय जनता पार्टीच्या वतीने सौ. लक्ष्मी सचिन दळवी यांनी सर्वसाधारण महिला गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सौ. लक्ष्मी दळवी या सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांनी महिला, नागरिकांच्या मूलभूत समस्या, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व सुरक्षा यांसारख्या विषयांवर सातत्याने काम केले आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक व पारदर्शक नेतृत्व देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अर्ज दाखल करताना भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते  उपस्थित होते. “प्रभागातील प्रत्येक घटकाला न्याय देत विकासाची गती वाढविणे हेच माझे ध्येय आहे,” असे सौ. दळवी यांनी यावेळी सांगितले.

या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय समीकरणांमध्ये नव्याने हालचालींना वेग आला असून आगामी निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

See also  कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका,मावळात 'धनुष्यबाण'च चालवा - अजित पवार