पाषाण येथे गावचे पोलीस पाटील पंडितराव जाधव यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर

पाषाण : पंचशील बुद्धविहार पाषाण येथे गावचे पोलीस पाटील पंडितराव जाधव यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले.

शिबीराचे उद्‌घाटन पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष राहूल कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. रेश्मा पाटील विभाग प्रमुख जन औषदवैधक शास्त्र सिम्बोसिस म.वै. महाविद्यालय व डॉ स्फूर्ती चाटे, डॉ, प्रतिक्षा जाधव, डॉ. रविसिंग डॉ. थोरात, आरती थोरवे, वजनसेवा चे डाॅ. पवार यांचे मार्गदर्शन झाले. २५०, रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला व चिंतामण जाधव यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यांचे आयोजन मा. उत्तम जाधव, नारायण जाधव,नंदू जाधव, राम चव्हाण, नवनाथ ववले, सुहास जाधव, प्रमोद कांबळे यांनी केले.

See also  जिंकण्यासाठी षडयंत्र रचणे हेच काँग्रेसचे चरित्र, भाजपच्या विजयासाठी मतदारच उत्सुक : धीरज घाटे