गुरुवारी बाणेर पांडुरंग देवालय येथे आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

बाणेर : बाणेर पांडुरंग देवालय येथे वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने भैरवनाथ शिक्षण संस्था प्रणित पार्वतीबाई धोंडीबा धनकुडे आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता बाणेर विठ्ठल रुक्मिणी देवालय येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास माजी आमदार मेधा कुलकर्णी, कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे, मुख्य कार्यकारी अभियंता राजेंद्र पवार, प्रांत निलप्रसाद चव्हाण, शरद गोसावी, अंकुर कावळे, रवींद्र बुंदिले, शिवलाल नाना धनकुडे, हनुमंत मुरकुटे, संजय मुरकुटे, पुणे बुलेटिनचे संपादक केदार कदम, विराज धनकुडे, राहुल धनकुडे आदी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी बायडाबाई ज्ञानोबा धनकुडे, लक्ष्मीबाई विष्णू कळमकर, कुसुम नामदेव चव्हाण, ताराबाई दत्तात्रय शिंदे, चंद्रभागा सावळाराम गायकवाड यांना आदर्श माता पुरस्कार देण्यात येणार आहे.

अखंड हरिनाम सप्ताह च्या निमित्ताने भव्य दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विठ्ठल रुक्मिणी लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहामध्ये बाळासाहेब रंजाळे, अरुणानाथ गिरी, उद्धव मंडलिक, प्रकाश आव्हाड, सोनाली दीदी करपे, अशोक ईगल, अशोक इदके, महेश हरवणे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

See also  बोपोडी मध्ये गणेश मूर्तींचे वितरण अवघ्या २१रूपयात गणेश मूर्ती