पुणे : राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समिती पुणे शहर तर्फे 12 जानेवारी राजमाता जिजाऊ जयंती लाल महाल येथे साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे प्रसिद्दा उदयोजक मा. संतोष सीताराम बारणे, मनपा प्रभारी नगरसचिव सौ योगिता भोसले, माजी नगरसेवक मधुकर जाधव, सौ मंजिरी कोठुळेयांच्या हस्ते राजमाता जिजाऊस पुष्पहार अर्पण करण्यात आला डॉ. वैष्णवी किराड, गणेश धावडे, गणेश नलावडे इ प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात काम कारणाऱ्या 12 आदर्श माता व 12 कर्तृत्ववान महिला यांना राजमाता जिजाऊ नावाने पुरस्कार देण्यात आला राजमाता जिजाऊ वर शालेय मुलगी सायली बोराडे हिने व्यख्यान केले.
यावेळी मा.संतोष बारणे यांनी आत्ताच्या प्रत्येक महिलांनी जिजाऊचा आदर्श घेतला पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमचे आयोजन समिती पुणे शहर अध्यक्ष युवराज दिसले यांनी केले स्वागत मुकेश यादव आभार वसंत खुटवड सूत्रसंचालन ऍड.संध्या देशपांडे, राहुल तांबे यांनी केले यावेळी समितीचे तानाजी शिरोळे, विक्रमसींग तौर,सौ स्मिता पवार,सुशील पवार, रणजित बहिरट, संगीता भालेराव, नारायण घुटे, सुभाष जेधे, सचिन वडघुले, सुनिल पवार, राकेश गायकवाड व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.