बाणेर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ काँग्रेसच्या वतीने कर्नाटक विजय निमित्त आनंद उत्सव साजरा

बाणेर : भारत जोडो यात्रेनंतर देशातील सर्वसामान्य जनतेमध्ये काँग्रेस विषयी आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात देखील आगामी विधानसभेला काँग्रेस पक्ष प्रभावी ठरणार आहे असे प्रदेश काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी सांगितले.
बाणेर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेस पक्षाच्या वतीने कर्नाटक मधील विजयाचा आनंद पेढे वाटून साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घोषणा देण्यात आल्या.

यावेळी माझी स्थायी समिती अध्यक्ष दत्ता बहिरट, माजी नगरसेवक शिवाजी बांगर, माजी नगरसेवक तानाजी निम्हण, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, चंद्रशेखर कपोते, सुनील पंडित, जीवन चाकणकर, सुनील जाधवर, मंगेश निम्हण, स्नेहल बांगर, अदिती गायकवाड, वसंत जाधवर, बाबा सय्यद, ओम बांगर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर काँग्रेस उपाध्यक्ष शिवाजी बांगर यांनी केले होते.

See also  चोरी झालेले प्रात्यक्षिकासाठीचे ईव्हीएम कंट्रोल युनिट पोलिसांनी केले जप्त