पाषाण : पाषाण बाजाराकडून निम्हण माळ्याच्या दिशेने जाताना के सी ओझा दुकान समोर व पुढे छ.संभाजी महाराज चौक येथे गेले अनेक दिवस झाली चेंबरची झाकण तुटलेली आहे. चेंबरची झाकणे तुटल्याने वाहनचालकांना सदरचा खड्डा कळून येत नाही त्यामुळे अपघात होऊ शकतात. चेंबरची झाकण दुरुस्त करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
सदर भाग हा गावठाण, बाजाराचे ठिकाण असल्याने व पुढे निम्हण मळ्यात मोठी लोकवस्ती असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणी रस्ता छोटा असल्याने येथे सतत वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे अनेक दुचाकी चालक वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्याच्या नादात या खड्ड्यात पडून अपघात होऊ शकतो. याठिकाणी अनेकदा छोटे अपघात झालेले आहेत.
अनेक नागरिकांनी औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयात तक्रारी करून सुद्धा संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहे.
.
तरी येत्या २४ तासामध्ये चेंबरची झाकण लावून होणारे अपघात व वाहतूक कोंडी टाळावी. जर येत्या २४ तासात चेंबरची झाकण बसविली नाही तर आपल्या कार्यालयासमोर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल व होणाऱ्या अपघातास आपणास जबाबदार धरले जाईल याची आपण नोंद घ्यावी. अश्याप्रकाचे निवेदन महापालिका सहाय्यक आयुक्त, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय, औंध, पुणे यांना देण्यात आले यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, उपविभाग अध्यक्ष पांडुरंग सुतार, विभाग सचिव संदीप काळे व कार्यकर्ते उपस्थित होते.