कोथरूड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विजय डाकले यांना स्वराज्य पक्षाच्या तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा जाहीर

पुणे : कोथरुड विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विजय बापू डाकले यांना छत्रपती संभाजी राजे यांच्या ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा’ पाठींबा देण्यात आला असून  पक्षाने त्यांना अधिकृतपणे पुरस्कृत केले.

विजय डाकले यावेळी म्हणाले, स्वराज्य पक्षाने मला पुरस्कृत केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. संभाजीराजे छत्रपती यांनी माझ्यावर विश्वास ठेवुन माझ्या पाठीशी ठामपणे ऊभे राहिले मी त्यांचा विश्वास सार्थ ठरवुन कोथरुड मतदारसंघात नक्कीच विजय मिळवणार.कोथरुड वासीयांनी दाखवलेल्या विश्वासाने मला प्रेरणा दिली आहे. या विश्वासाला चांगला प्रतिसाद देत, आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपले कष्ट आणि समर्पण कायम ठेवेन. विधानसभा निवडणुकीत आपला विश्वास नक्कीच विजयात रूपांतरित करेल.

दरम्यान महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या मेळाव्यामध्ये विजय डाकले यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून पत्र देण्यात आले. कोथरूड मतदार संघातील बहुजन चेहरा म्हणून विजय डाकले निवडणूक लढवत आहेत. तसेच यापूर्वी क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी त्यांनी काम पाहिले आहे.

See also  इंडियन डेंटल असोसिएशन पिंपरी चिंचवड च्या अध्यक्षपदी डॉ.अतुल पाटील यांची निवड