औंध क्षेत्रीय कार्यालयाकडून नववर्षाच्या स्वागतासाठी घाणीच्या ठिकाणी स्वच्छता करून रांगोळी

औंध : औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 8 व 9 मध्ये नवीन वर्षाच्या स्वागताकरिता घाणीचे ठिकाण साफ करून त्या ठिकाणी रांगोळी काढण्यात आल्या व स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

यापुढे त्या ठिकाणी कचरा पडणार नाही याची काळजी घेऊन सदर ठिकाणी रोजच्या रोज घरातूनच ओला व सुका वेगळा करून नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर कचरा पडलेला दिसून येणार नाही सदर परिसरामध्ये आरोग्य निरीक्षक श्री योगेश जाधव,श्री शिवाजी गायकवाड मुकादम श्रीमतीअनिता बाराथे , सिद्धार्थ बागुल, विकास कांबळे यांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना चांगल्या प्रकारे नियोजन करून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देऊन परिसरामध्ये स्वच्छता राखण्याबद्दल आवाहन केले आहे.

सदरचा कार्यक्रम महापालिका सहाय्यक आयुक्त श्री गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनानुसार व डी एस आय सुनील कांबळे यांनी नियोजन केले होते. तसेच डिसेंबर 2023 अखेर पर्यंत दंडात्मक कारवाई 380 केसेस 246650 प्रशासकीय शुल्क जमा करण्यात आले.

See also  औंध, पाषाण, बाणेर गणेश उत्सवासाठी प्रशासन सज्ज ; इथे आहे विसर्जनाची व्यवस्था