शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कुस्ती मैदानाच्या आयोजन

पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर तर्फे ३५० शिवराज्याभिषेक दिना निमित्ताने महाराष्ट्र मंडळ येथे १७ वर्षाखालील मुले व मुलींच्या कुस्ती मैदान आयोजित करण्यात आली होती.

या वेळी १०० निकाली कुस्त्या लागल्या विजेत्यास प्रमाण पत्र सन्मानचिन्ह, मेडल व छत्रपती शिवाजी महाराज यांची फ्रेम देण्यात आली.

यावेळी कसबा मतदारसंघ विद्यमान आमदार मा रविंद्र धंगेकर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद सरचिटणीस बाळासाहेब लांडगे ,रोहन दामले अकुंश काकडे, दीपक पोकळे , डॉ मदन कोठुळे सर बाळासाहेब आमराळे, नामदेव मानकर ,श्री विष्णू आहिरे , वस्ताद संभाजी अप्पा शिंदे , पै नितीन दांगट, बापु दिसले, अप्पा रेणुसे, वस्ताद कुष्णा बराटे, बाबा मते, प्रविण शेठ दुधाणे,श्रृतिका पाडाळे, मिलन पवार, भाग्यश्री बोरकर,रासने मॅडम, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, अरूण गवळे, नंदकुमार जाधव,रर्विंद्र पठारे, आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे अध्यक्ष युवराज दिसले यांनी केले सुत्रसंचालन पै श्याम शिंदे यांनी केले, स्वागत गणेश मापारी यांनी केले आभार सचिन वडघुले यांनी मानले. आखाडा पंच कमिटी मध्ये राजीव कदम, संदिप जगदाळे, तुषार गोळे, वरद उमरदंड, यांनी काम बघितले सुनिल पवार, भरत गायकवाड, राकेश गायकवाड, रणजित बहिरट, रविंद्र दळवी,राकेश रेपाळे, अमर निगडे, अनिकेत भगत, नितीन भरम, प्राविण गोगावले, अभिजीत भिसे, निरंजन गुंजाळ, सुशिल पवार , दशहरी चव्हाण, स्मिता पवार,गणेश गोकुळे या सर्व पदाधिकारांनी कार्यक्रम यशस्वी केला.

See also  जी-२० परीषदेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न