स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जयंतीनिमित्त झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील लाभार्थ्यांना सदनिका हस्तांतरण

पिंपरी : लोकनेते स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त आज झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पिंपरी मधील नेहरुनगर येथील डॉ.आंबेडकर नगर पुनर्वसन प्रकल्पातील १४० लाभार्थ्यांना सदनिकांचे हस्तांतरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .

याप्रसंगी आमदार शंकरभाऊ जगताप, माजी आमदार अश्विनी वहिनी जगताप, माजी महापौर हणमंत भोसले, वैशाली घोडेकर, माजी नगरसेवक राहुल भोसले, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या पुढाकाराने आज देशातील प्रत्येक घरात स्वच्छतागृह आणि उज्वला योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वयंपाकघरात गॅस सिलिंडर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आज ही घरं उपलब्ध करून देत असताना अतिशय आनंद होत आहे.

See also  लोणावळा शहरातील विविध नागरी समस्यांचाउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा