धायरी डिपी रोड, कात्रज पूल, ट्रॅफिक, आदी प्रश्नांसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांची पुणे मनपा आयुक्तांसोबत बैठक

पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापलिकेत विविध मुद्द्यांबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम याच्यासोबत बैठक घेतली. यावेळी धायरी डिपी रोड, कात्रज पूल, ट्रॅफिक, आणि महपलिकेतील समाविष्ट गावांमधील पायाभूत समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी आयुक्तांनीही समस्या सोडवण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.  याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक सचिन दोडके, महादेव कोंढरे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सोपान काका चव्हाण, स्वप्निल दुधाने, खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबक अण्णा मोकाशी, राजेश्वरी पाटील, उल्हास शेवाळे, सुधीर कोंढरे, शरद दबडे पाटील, अनिता इंगळे,  प्रभावती भूमकर, पोपटराव खेडेकर, खुशाल करंजावणे, सुरेखा दमिष्टे,  निलेश दमिष्ठे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

See also  मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपतीच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान : खासदार मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती